28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriडॉ. परकार यांची लाखोंची फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात

डॉ. परकार यांची लाखोंची फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात

गाडी मिळण्यासाठी थोडी वाट पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे गाडीबद्दल विचारणा केली असता समोरील व्यक्ती कोणतेच उत्तर समाधानकारक देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

रत्नागिरी शहरातील प्रसिध्द डॉक्टर मतीन परकार यांची मुंबईतील एका कार विक्रेत्याकडून फसवणूक झाल्याची घटना २९ सप्टेंबर २०२१ रोजी घडली होती. त्या संदर्भात त्यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती. त्याचा तपास करून शोध घेत असता, संबंधित एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डॉ.मतीन परकार यांनी आपले वडिलांच्या नावे स्कोडा कार विकत घ्यायची होती. यासाठी त्यांनी नवी मुंबई येथील कार विक्रेते अर्जुन राजेश राज वय २३, रा. कळंबोली, नवी मुंबई यांच्याकडे कारची चौकशी केली. त्यानंतर चौकशीअंती व्यवहार ठरला.

डॉ. परकार यांनी कारची रक्कम ३६ लाख रुपये अर्जुन राज याच्या बँक खात्यात जमा केली. गाडी मिळण्यासाठी थोडी वाट पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे गाडीबद्दल विचारणा केली असता समोरील व्यक्ती कोणतेच उत्तर समाधानकारक देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेमेंटकरून ३ महिने उलटून गेले तरी, कारची डिलिव्हरी राज याने केली नव्हती. डॉ. परकार गाडीच्या डिलीव्हरी संदर्भात कायम  त्याच्या संपर्कात राहिले होते. परंतु, काही कालावधीनंतर मात्र राज डॉ. परकार यांना दुर्लक्षित करून, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मग मात्र आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. परकार यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली.

रत्नागिरी शहर पोलिसांकडून अर्जुन राज याचा शोध घेण्यात येत होता. त्याच्याविषयी पोलिसांनी माहिती काढली. संशयित आरोपी राज हा तळोजा जेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. याबाबतचा अधिक तपास रत्नागिरी पोलिसांकडून सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular