कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह वरून निगेटिव्ह झाल्यानंतरही तुमची पूर्ण बरे होण्याची शाश्वती नाही. अनेक रुग्णांना संसर्गानंतर कोविड नंतरच्या कॉम्प्लिकेशनला सामोरे जावे लागते. या विषाणूमुळे उद्भवलेल्या समस्या आहेत, ज्या दीर्घकाळापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या जीवनात समस्या बनून राहू शकतात. योग्य खबरदारी जर घेतली नाही तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुढील ३ महिने रुग्णांनी सतर्क आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहावे. कारण या काळात पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. काही रुग्णांना सामान्य समस्या असू शकतात, तर काही गंभीर स्वरूप घेऊ शकतात.
जेव्हा कोरोना व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढते. या दरम्यान, शरीरात माइक्रो न्यूट्रिएंट्स सेवन वाढते, ज्यामुळे शरीर कमकुवत होते. कोरोनामधून बरे झाल्यानंतरही, मायक्रो न्यूट्रिएंट्स कमतरतेमुळे ही कमजोरी कायम राहते. त्यामुळे अनेक लोकांमध्ये कोविड नंतरच्या कॉम्प्लिकेशनची लक्षणे सहा महिन्यांपर्यंत दिसून येतात.
या कारणास्तव, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही, चक्कर येणे, थकवा, सौम्य ताप, सांधेदुखी इत्यादी लक्षणे कायम राहतात. त्याचप्रमाणे श्वास घ्यायला त्रास होणे, थकवा आणि सुस्ती येणे, हृदयाचे ठोके वाढणे, मासपेशींमध्ये वेदना होणे, खोकला, भूक कमी लागणे, जास्त घाम येणे, चक्कर येणे , डोकेदुखी, झोप स्वस्थ न लागणे, महिलांची पीरियड सायकल बदलणे, डिप्रेशन इत्यादी प्रकारचे आजार जाणवतात.
पोस्ट कोविड मध्ये मुख्यत: रक्त पातळ होण्यासाठी गोळ्या दिलेल्या असतात, त्या जर वेळेत नाही घेतल्या तर, हार्ट आणि ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यात आहे. तुम्हाला नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे देखील स्ट्रोक होऊ शकतो. जर या गुठळ्या मेंदूपर्यंत पोहोचल्या तर ब्रेन स्ट्रोक आणि जर ते हृदयापर्यंत पोहोचले तर हार्ट स्ट्रोक होऊ शकतो. त्याचप्रमाणे एका सोबत अनेक अवयाप निकामी ठरू शकतात. त्यालाच मल्टी ऑर्गन फेल्युर असे म्हणतात. मेंदू आणि हृदयासह मूत्रपिंड, यकृत यांसारखे अवयव निकामी होत जातात.
त्यामुळे कोरोनामधून बरे झाल्यावर सुद्धा काही महिने या गोष्टींकडे सतत लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. शरीरात पाणीची कमतरता निर्माण होऊ न देणे. श्वासासंबंधीत योगासने करावीत. दररोज साधारण जमेल इतका व्यायाम करावा. चिंता आणि नैराश्य टाळण्यासाठी, आपले मन आपल्या आवडत्या इतर कार्यामध्ये गुंतवून ठेवावे. काही समस्या वाटल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.