26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriमंदिराच्या दानपेट्या फोडून पसार होणारा चोर अखेर पोलिसांनी सिंधुदुर्गातून घेतला ताब्यात

मंदिराच्या दानपेट्या फोडून पसार होणारा चोर अखेर पोलिसांनी सिंधुदुर्गातून घेतला ताब्यात

हा चोरटा सातत्याने पोलिसांना चकवून पळून जाण्यास यशस्वी होत होता.

रत्नागिरीमध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये मधील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरातील मूर्ती चोरणे, दानपेटी फोडून त्यातील पैसे घेऊन पसार होणे अशा घटना वारंवार विविध ठिकाणी एक दोन दिवसाच्या फरकाने घडत होत्या. त्यामुळे पोलीस सुद्धा अशा सऱ्हाईत चोरांच्या मागावरच होते. रत्नागिरी जिल्ह्यासह लगतच्या तळकोकणामध्ये देखील अशा प्रकारच्या चोऱ्यांचे पेव फुटले होते.

आज अखेर, रत्नागिरीच्या पोलिसांनी जिल्ह्यासह इतर ठिकाणी मंदिरांच्या दानपेट्या फोडणाऱ्या व सातत्याने चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आवळल्या आहेत. विविध सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली आहे. हा चोरटा सातत्याने पोलिसांना चकवून पळून जाण्यास यशस्वी होत होता. मात्र रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रसाद घोसाळे व पोलिस नाईक नंदकुमार सावंत यांनी सिंधुदुर्गमधून या चोरट्याला ताब्यात घेतले आहे. यामुळे जिल्ह्यात इतरत्र घडलेल्या चोऱ्यांचा देखील लवकरच उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील पोमेंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी ग्रामदेवतेच्या मंदिरातील पाच दानपेट्या या चोरट्याने फोडल्या होत्या. याबाबत दिलीप श्रीकृष्ण पटवर्धन वय ६२, रा. हनुमानवाडी पोमेंडी खुर्द यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत सतीश मुरलीधर झाजम वय ४३, रा. तळेबाजार, देवगड, सिंधुदुर्ग या संशयित आरोपीला अटक करून ताब्यात घेतलं आहे.  त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस सापडलेल्या चोराकडून विविध प्रकारे माहिती उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular