28.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...
HomeRatnagiriवेगात असलेला ट्रॅक्टर पलटी होऊन, १ मृत तर ३ जखमी

वेगात असलेला ट्रॅक्टर पलटी होऊन, १ मृत तर ३ जखमी

ट्रॅक्टरच्या हौदामधील सिमेंटची पोती शंभू ईश्वर पासवान याच्या अंगावर पडल्यामुळे तो पोत्यांखाली चिरडला गेला.

संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव घाटातील किरदाडी फाटा येथे सिमेंटच्या पोत्यांचा भरलेला ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ११ रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. वळणावर ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे, अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे.

याबाबत देवरूख पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आंबव येथून साईटवरून सिमेंटची पोती ट्रॅक्टरमध्ये भरून एमएच०९, यु ३७६६ हा ट्रॅक्टर पूर गावाच्या दिशेने येत होता. ट्रॅक्टर पाठीमागील हौदामध्ये सिमेंटच्या पोत्यांवर अजून चौघेजण बसले होते. पाटगाव घाटातील किरदाडी फाटा येथील उतारात ट्रॅक्टर येताच, वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरील चालक रामनाथ सिंह याचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर रस्त्याच्या डाव्या बाजूला जावून पलटी झाला. यामुळे वरती पोत्यांवर बसलेले कामगार बाहेर फेकले गेले.

आणि ट्रॅक्टरच्या हौदामधील सिमेंटची पोती शंभू ईश्वर पासवान याच्या अंगावर पडल्यामुळे तो पोत्यांखाली चिरडला गेला. आणि यातच त्याचा मृत्यू ओढावला. अपघाताची माहिती देवरूख पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पाटील,  सहाय्यक पोलीस फौजदार डी. एस. पवार,  हे. काँ. संतोष सडकर, पो. ना. संदीप जाधव,  हे. काँ. सचिन भुजबळराव, पो. काँ. पायल भिसे आदिंनी घटनास्थळी धाव घेत रितसर पंचनामा केला.

त्याचप्रमाणे सिमेंटच्या पोत्यांखाली चिरडलेल्या शंभू पासवान याला देवरूख ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी आणल्यानंतर, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत असे घोषित केले. तर अपघातात संजीत योगेंद्र गिरी, विश्वनाथ वैजनाथ पासवान, कारी नगीना पटेल हे तिघे देखील जखमी झाले आहेत. यापैकी कारी पटेल अधिक जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे. अपघातप्रकरणी देवरूख पोलीसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरूख पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular