30.8 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

निवडणुकीसाठी २२३ एसटी बस आरक्षित….

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी...

नारायण तलावावर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर चिपळूण नगरपालिकेचा पुढाकार

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नारायण तलाव परिसरात...

जगबुडी नदीकिनारा अस्वच्छतेच्या विळख्यात…

जगबुडी नदीकिनारी शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत...
HomeTechnologyगुगलकडून गेमप्रेमींसाठी अनोखे गिफ्ट, प्ले पासबद्दल जाणून घेऊया

गुगलकडून गेमप्रेमींसाठी अनोखे गिफ्ट, प्ले पासबद्दल जाणून घेऊया

ज्याद्वारे ग्राहकांना मोबाईलवर गेम खेळत्यावेळी कोणत्याही प्रकारे जाहिरात त्रास देणार नाही.

स्मार्ट फोन म्हटला कि, त्यावर विविध प्रकारे आपण वेळ घालवू शकतो. विविध प्रकारचे गेम्स, गाणी, ऑनलाईन सिरियल्स, मुव्हीज यांचा घरबसल्या आस्वाद घेता येऊ शकतो. पण अनेक वेळा या सिरियल्स आठवा मुव्हीज, गेम्सच्या मधीच वेगवेगळ्या निरुपयोगी जाहिराती येत असतात. त्यामुळे मग या गोष्टी करणे कंटाळवाणे होऊ लागते. यावर उपाय म्हणून गुगल ने एक युक्ती लढवली आहे.

गुगलने आज एक नवीन सेवा सुरू केली आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोरवर ‘प्ले पास’ या नावाने एक नवीन भाग सुरू केला आहे. ज्याद्वारे ग्राहकांना मोबाईलवर गेम खेळत्यावेळी कोणत्याही प्रकारे जाहिरात त्रास देणार नाही. गुगलची ही सेवा मोफत नसून,  त्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे. मासिक किंवा वार्षिक फिस भरुन ग्राहक गुगलच्या या ‘प्ले पास’ सेवेमुळे १००० पेक्षा अधिक अॅप्स आणि गेम्सचा विना जाहिराती आनंद घेऊ शकता येणार आहे. गुगलने सुरू केलेल्या आपल्या नव्या सेवेत जंगल अॅडव्हेंचर्स, वर्ल्ड क्रिकेट बॅटेल यासारखे अनेक गेम उपलब्ध आहेत.

मोबाईलवर गेम खेळता-खेळता अचानक जाहिरात आल्याने, अनेकांची चिडचिड निर्माण होते. अशा ग्राहकांसाठीच गुगलने अनोखे गिफ्ट दिले आहे. आता गेम खेळता-खेळता जाहिरात त्रास देणार नाही. ही गेम प्रेमींसाठी आनंदाची बातमीच म्हणावी लागले.

गुगलच्या या नव्या सेवेत, यूटर युनिट कन्व्हर्टर, ऑडिओलॅब आणि फोटो स्टुडिओ प्रो सारखे अॅप्स देखील मिळू शकणार आहेत. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘प्ले पास’ साठी ग्राहक एक महिन्याच्या फ्री ट्रायलपासून याची सुरुवात करु शकतात आणि त्यानंतर प्रति महिना ९९ रुपये किंवा वार्षिक ८८९ रुपये सदस्य होऊ शकतात. तसेच ग्राहक १०९ रुपयांमध्ये एक महिन्याचे प्रीपेड सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकतात. तसेच कंपनीने सांगितले आहे की, गुगल फॅमिली ग्रुप याद्वारे गुगल पास ही सेवा, एका व्यक्तीच्या नावाने घरातील किमान पाच व्यक्ती शेअर करून त्याचा आनंद लुटू शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular