27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriबावनदीतील गाळ, एक दिवसीय धरणे आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

बावनदीतील गाळ, एक दिवसीय धरणे आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

जिल्ह्यातील उ‌‌क्षी-वांद्री परिसरातील बावनदीचे पात्र पूर्ण गाळाने भरून गेले आहे.

चिपळूणमध्ये जुलै महिन्यात आलेल्या महापुरापासून नदी आणि खाडीच्या किनाऱ्याजवळपास असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यातील उ‌‌क्षी-वांद्री परिसरातील बावनदीचे पात्र पूर्ण गाळाने भरून गेले आहे. आणि त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले कि, पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच कुठे उपलब्ध नसल्याने, त्याचे रूप पुरामध्ये होते.

त्यामुळे किनाऱ्या लगतच्या घरांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. ८०-१०० एकर शेतजमीन पुरामुळे नापिक बनली आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा चांगलाच फटका येथील ग्रामस्थांना बसला आहे. तशी परिस्थती भविष्यात पुन्हा उद्भवू नये, यासाठी १५ मार्चपुर्वी बावनदीतील गाळ उपसण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांसह मुझम्मील काझी यांनी केली आहे.

तसेच या बावनदीच्या गाळ उपशाला १५ मार्च पूर्वी सुरुवात केली नाही तर, एक दिवसीय आंदोलन करणार असे उक्षी ग्रामस्थ व गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी सांगितले आहे. उक्षी ग्रामस्थ व गाव विकास समितीचे पदाधिकारी यांनी बावनदी पात्रातील गाळ उपसण्यात यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा आहेत, मागील सततची ३ वर्षे इथले ग्रामस्थ बावनदीतील गाळ उपसण्यात यावा यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहेत, परंतु संबंधित प्रशासनाने याकडे पाठ फिरवली आहे.

२१ मार्च रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जर १५ मार्चपुर्वी गाळ उपशाला सुरुवात झाली नाही तर, शासनाच्या दिरंगाईबाबत, निषेध नोंदवताना उक्षी ग्रामस्थ तसेच गाव विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करु असा इशारा मुझम्मील काझी यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular