27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriलांजा- साटवली मार्गावरील दुचाकी आणि कार अपघात, विद्यार्थी गंभीर जखमी

लांजा- साटवली मार्गावरील दुचाकी आणि कार अपघात, विद्यार्थी गंभीर जखमी

दुचाकीवरून कॉलेजला जात असताना मोटारसायकल व कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात कॉलेज विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

सध्या महामार्गावर एसटीचा संप असल्या कारणाने प्रवासासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या कॉलेज आणि शाळा सुद्धा ऑफलाईन सुरु झाल्याने परंतु, एसटी बंद असल्याने अनेक विद्यार्थी दुचाकीद्वारे प्रवास करताना दिसून येत आहेत. परंतु, अनेक वेळा बेदरकारपणे वाहन चालवून अपघात घडण्याच्या घटना घडत आहेत. स्वत: सह समोरच्याला सुद्धा इजा पोहचते.

बुधवार सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान लांजा- साटवली मार्गावरील जावडे फाटा येथे मोटारसायकल आणि कारमध्ये टक्कर होऊन अपघात घडला. दुचाकीवरून कॉलेजला जात असताना मोटारसायकल व कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात कॉलेज विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. दिप्तेश धोपटे वय- २३, रा. कोंडयेतळ, राजापूर असे अपघातात जखमी झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे नाव आहे.

दिप्तेश हा लांजा महाविद्यालयात शिकत असून रोजच्याप्रमाणे बुधवारी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी दिप्तेश आपल्या ताब्यातील मोटारसायकल एम एच ०८, एस-३३४८ घेऊन निघाला होता. मोटारसायकल वरून लांजा-साटवली मार्गाने जात असताना मोटारसायकल जावडे फाटा येथे आली असता, दिप्तेश याची नजर भरकटल्याने त्याचा अचानक मोटारसायकलवरील ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या कारवर जाऊन तो वेगाने धडकला. दोन्ही वाहनांचा वेग साधारण अधिकच असल्याने धडकेनंतर दिप्तेश रस्त्यावर जोरदार आपटला आणि याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान राहून ताबडतोब दिप्तेश याला इतर वाहन चालकांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला मुका मार जास्त लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी त्याला १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular