रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील शहर परिसरामध्ये असलेल्या इमारती, दवाखाने, घरे, यांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहरापासून थोड लांब अशा विहिरी बांधलेल्या आहेत. ज्यांना पाणी साठा भरपूर असल्याने, तिथून बहुतकरून शहर परिसरामध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो.
शहर परिसरात असलेले विविध इमारती यांना पाणी पुरवठा करण्यासाठी शहरापासून १ कि. मी. परिसरात अशा विहिरी बनवलेल्या आहेत. यामधून या इमारतीमधील रहिवासी व दवाखाने यांना पाणी पुरवठा केला जातो. मंडणगड शहरातील यातील एका विहिरीत पडून दोन रानडुकरांचा मृत्यू झाला आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे ही बाब स्थानिकांच्या ध्यानात आली.
शनिवारी या विहीर परिसरातून दुर्गंधी येऊ लागल्याने काही नागरिकांनी या विहिरीत डोकावले असता दोन डुक्कर पडून मृत झाल्याचे दिसले. बराच कालावधी गेल्यामुळे ते फुगून पाण्यावर तरंगू लागले होते. नेहमीच्या वापरात असलेल्या या विहिरीला कोणतेही झाकण अथवा बंदिस्त करण्यात आले नव्हते, त्यामुळे हा प्रकार घडला आहे. या विहिरीतील पाणी परिसरातील नागरिकांना सोडण्यात येत होते. त्यामुळे असे दुषित पाणीच घरोघरी पोहोचले असेल.
नेहमीच्या वापरात असणाऱ्या या विहीरीवर काहीतरी झाकण अथवा जाळी टाकून बंदीस्त करने अपेक्षित होते, ती नव्हती त्यामुळे हा प्रकार घडला आहे. या परिसरात निवासी संकुलाचे पाणी बंदीस्त नसलेल्या गटारांतूनही ओढयाला सोडण्याच्या पध्दतीमुळे, गेल्या काही महिन्यांपासून संकुलाचे गटारातील पाण्यावर जंगली रान डुकारांचा वावर वाढल्याचे अनेकांचे निदर्शनास आले आहे त्यामुळे अशा समस्यांकडे प्रशासनाने वेळेत लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर शहरामध्ये रोगराई पसरायला वेळ लागणार नाही.