उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सीईटी परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले असल्याबद्दलची माहिती दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले मिळालेले गुण कमी वाटत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या परीक्षांप्रमाणेच पुन्हा परीक्षा घेऊन अधिक गुण मिळवण्याची संधी देण्यात येणार असल्याचीही महत्वाची घोषणा यावेळी त्यांनी केली आहे. तसेच या संदर्भातील मोठा बदल म्हणजे आतापर्यंत विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासाठी CET गुणांवर प्रवेश देण्यात येत असे. मात्र आता बारावीचे ५० टक्के आणि CET चे ५० टक्के अशा एकूण गुणांवर पदवीला प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे बारावीच्या गुणांचे महत्वं यापुढे अधिकच वाढणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्र्यांनी यांनी सांगितले आहे.
त्याप्रमाणे, सीइटीचा निकाल पुढच्या वर्षीपासून १ जुलै रोजी लागणार आहे. आणि १ सप्टेंबर पासून शैक्षणिक सत्र सुरू होईल अशा प्रकारचे नियोजन असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांना CET परीक्षा देऊन कोणत्याही प्रकारच्या पदवी कार्यक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि सीईटीद्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेश प्रक्रियांना हा नियम लागू असणार आहे. या परीक्षेच्या तारखा एमएचटी सीईटी परीक्षा २०२२ साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या ०५ ते ११ ऑगस्ट, २०२२ या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर PCB ग्रुपची परीक्षा ही १२ ते २० ऑगस्ट, २०२२ दरम्यान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे
तर १५, १६ व १७ ऑगस्ट या तारखांना कोणतेही पेपर नसणार आहेत. दरम्यान JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये घोळ होऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

