26.7 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeChiplun“तुम्ही तुमचे बघून घ्या” सांगत पेढे- परशुराममधील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा

“तुम्ही तुमचे बघून घ्या” सांगत पेढे- परशुराममधील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा

भूगर्भीय सर्वेक्षणात प्रथमच पेढे गावामधील कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि परशुराममधील लांबेवाडी, सुतारवाडी, ब्राह्मणवाडी, दुर्गवाडी अशा अनेक वाड्यांमधील काही भागाचा दरडप्रवण क्षेत्रात समावेश झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक परशुराम मंदिरामुळे भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान असलेला परशुराम घाट दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. या परिसरात सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम किंवा अन्य भूगर्भीय कारणांमुळे या डोंगराची माती ढाळसण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. यामुळे यंदा केलेल्या भूगर्भीय सर्वेक्षणात प्रथमच पेढे गावामधील कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि परशुराममधील लांबेवाडी, सुतारवाडी, ब्राह्मणवाडी, दुर्गवाडी अशा अनेक वाड्यांमधील काही भागाचा दरडप्रवण क्षेत्रात समावेश झाला आहे.

परिणामी अनेक पिढ्या वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. केवळ सरकारच्या निष्क्रियतेमुळे आज आमचे हे जीव धोक्यात आल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. शासनाच्या कर्मचार्यांनी सकाळच आमच्या हातात घर रिकामे करण्याचे पत्र दिले आणि तसे नाही केले, तर पुढे काही अनर्थ घडल्यास त्याची आमची जबाबदारी नाही, असे सांगून हात वर केले गेले. पावसाच्या तोंडावर हातात आलेली ही नोटीस पाहून आमच्या पायाखालची जमीन सरकली.

पेढे आणि परशुराम या परिसरात सध्या जी कामे सुरू आहेत, त्याबाबत स्थानिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता सुरु आहेत. तसेच स्थानिकांचे कोणतेही मत या कामासंबंधी विचारात घेण्यात आलेले नसल्याचा संताप परशुरामचे स्थानिक अभय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला. येथे सुरू असलेल्या कामांमुळे आमच्या  जुन्या वास्तूंना धोका निर्माण होत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनापासून ते राज्यातील आणि केंद्रातील मंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला तरी साधी दखलही कोणी घेतली नसल्याची खंतही सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.

दरडप्रवण भागांचे सर्वेक्षण झाल्यानंतर पाऊस सुरू व्हायच्या दोन दिवस आधी आमच्या हातात नोटीस पडली. त्यामध्ये घरातील सदस्यांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे नमूद केले होते. या नोटीसवर कोणतीही तारीख तर नव्हतीच शिवाय घर क्रमांकही नव्हता. याबाबत प्रशासनाला प्रश्न केला असता, संबंधित अधिकाऱ्यांनी ‘तुम्ही तुमचे बघून घ्या’ असा उद्धटपणे सल्ला दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular