27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriमिऱ्यावासियांना स्थलांतराची नोटीस, ग्रामस्थ नाराज

मिऱ्यावासियांना स्थलांतराची नोटीस, ग्रामस्थ नाराज

पंधरामाड ते अलावा या साडेतीन किलोमीटरच्या किनारी भागात राज्य शासनाने सुमारे २६९ कोटींचा बंधारा मंजूर केला.

रत्नागिरी तालुक्यातील मिर्‍या येथील अलावा शेट्येवाडी जवळील बंधार्‍याचे काम पूर्ण करण्यापेक्षा किनार्‍यावरील ग्रामस्थांना स्थलांतर करण्याची नोटीस दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. याची गंभीर दखल घेऊन पतन विभागाकडून तत्काळ कामाला आरंभ केला आहे. याठिकाणी वाहून गेलेल्या जागेत दगड टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहेत.

पंधरामाड ते अलावा या साडेतीन किलोमीटरच्या किनारी भागात राज्य शासनाने सुमारे २६९ कोटींचा बंधारा मंजूर केला. पत्तन विभागाच्या अधिपत्याखाली या बंधार्‍याचे काम होणार आहे. सुमारे पाच महिन्यांपुर्वी या कामाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. परंतु, त्यानंतर देखील काम संथ गतीनेच सुरु आहे. बंधारा उभारला जाणार नसल्याने पावसाळ्यात धोका पोचू नये यासाठी सात ठिकाणी दगड टाकून समुद्राच्या लाटा रोखण्याचे काम हाती घेण्यात आले;  मात्र त्यातील सर्वात धोक्याचा भाग असलेल्या अलावा-शेट्येवाडी जवळ दुरुस्तीचे काम केलेले नाही. तेथे समुद्राच्या लाटांमुळे भगदाड पडले आहे.

पत्तन विभागाच्या सर्व्हेमध्ये पंधरामाड १,  भाटमिर्‍या ३,  जाकिमिर्‍या २ आणि आलावा २ अशी सात ठिकाणे होती. अलावा येथील भगदाड ठेकेदाराने तसेच ठेवले. पत्तन विभागाने बंधार्‍याला पडलेले भगदाड भरुन काढण्याची सुचना देवून तेथील काम पुर्ण करुन घेणे अपेक्षित असतानाही तलाठ्यांच्या सहीने ग्रामस्थांनाच सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटीसा बजावण्या आल्या. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

पतन विभागाच्या अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून याबाबत जाब विचारण्यात आला होता. ग्रामस्थांच्या नाराजीची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून शेट्येवाडीत बंधार्‍याला पडलेले भगदाड बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दगड टाकून लाटांचे पाणी रोखले जाणार आहे. सुरक्षेचे काम सुरु केल्यामुळे समाधान व्यक्त केले जात असले तरीही तात्पुरते टाकलेले दगड किती काळ तग धरणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular