27 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

रत्नागिरीजवळ भाट्ये येथे अपघात…

रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर भाट्ये गावाकडे...

राजापूर तालुक्यामध्ये आढळली अतिदुर्मीळ ‘हंसतुरा’ प्रजाती

राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी, एक अतिदुर्मीळ आणि...

कोल्हापूरकरांसमोर ‘वनतारा’ झुकलं ! ‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात येणार

हत्तीणीला पुन्हा पाठवण्यात येणार आहे. वनताराचे सीईओ...
HomeChiplunपावसाळा सुरु होणार असल्याने, चिपळूणवासीय अजून देखील भीतीच्या सावटाखाली

पावसाळा सुरु होणार असल्याने, चिपळूणवासीय अजून देखील भीतीच्या सावटाखाली

नद्यांमधील गाळ काढण्याचे काम सुद्धा सुरु आहे. पण अजून संपूर्ण गाळ काढून पूर्ण झालेला नसल्याने, चिपळूणमधील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखालीच वावरत आहेत.    

मागील वर्षी कोकणामध्ये झालेल्या सुरुवातीच्या पावसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नदी किनारी वसलेल्या गावागावामध्ये पाणी घराघरात घुसले. शेतीच्या शेती वाहून गेली. कच्ची घरे वाहून गेली, कागदपत्रे, भांडी, कुंडी, गाड्या अनेक मालमत्ता डोळ्यासमोर महापुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे अजूनही याची आठवण आणि भीती चिपळूणवासीयांच्या मनामध्ये राहिली आहे. पावसाळा सुरु होण्यास काही अवधी राहिला असून, नद्यांमधील गाळ काढण्याचे काम सुद्धा सुरु आहे. पण अजून संपूर्ण गाळ काढून पूर्ण झालेला नसल्याने, चिपळूणमधील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखालीच वावरत आहेत.

कोकणात गेल्यावर्षी चिपळूण शहरातील महापुराने थैमान घातले पण त्यांनतर पुन्हा चिपळूण सावरले असले तरिही हा धोका यंदाही टळला आहे याची खात्री गाळ काढण्यात आल्यानंतरही देणे कठीण आहे. चिपळूण शहराला गेल्या वर्षी २२ जुलै २०२१ हा दिवस काळरात्र ठरला.

अनेक संसार उध्वस्त झाले. अनेक उघड्यावर पडले. जगण्याचे साधनच संपून गेले. अनेक माणसांचे पुराच्या पाण्यात हकनाक बळी गेले. यातुन मुकी जनावरही सुटली नाहीत त्यामुळे स्वाभाविकपणे वशिष्ठ नदीतला गाळ काढण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी उपोषण करण्याचा लढा दिला ही मागणी पूर्ण काही अंशी मान्य झाली कामही झाले पण काही जाणकारांच्या मते अनेक त्रुटी आहेत नियोजनाचा अभाव आहे, म्हणून हा धोका टळलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.

१९८९ पासून लाल व निळी धोक्याची रेषा आजही कोणत्याही उपाययोजना न केल्याने आजही त्या रेषा शहर बाजारपेठ स्थलांतर करा असे दर्शवणाऱ्या रेषा कायम आहेत. महापुरा संबंधी वेगवेगळ्या शंका कुशंका आमच्या मनात आजही आहेत असं इथले स्थानिक सांगतात.

RELATED ARTICLES

Most Popular