26.2 C
Ratnagiri
Saturday, April 19, 2025

विद्यार्थ्यांच्या शोधात जिल्हा परिषदेचे शिक्षक घरोघरी

नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश...

जिल्हावासीयांचे १२३ प्रश्न निकाली – पालकमंत्री उदय सामंत

रस्त्यांचे डांबरीकरण होत नाही, साकव नाही, जागेचा...

प्रस्तावित ८४ लघुउद्योगतून रोजगारनिर्मिती सोवेली औद्योगिक वसाहत

मंडणगड तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध...
HomeRatnagiriपावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदित, दुबार पेरणीचे संकट टळले

पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदित, दुबार पेरणीचे संकट टळले

जून महिन्याच्या पहिल्या वीस दिवसांत रत्नागिरी जिल्ह्रयावर रुसलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.

मान्सूनने गेल्या दोन दिवसांत तालुक्यात आपले बस्तान बसवल्याने चिंतातूर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. जून महिन्याच्या पहिल्या वीस दिवसांत रत्नागिरी जिल्ह्रयावर रुसलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. जर पाऊस आला नसता तर एक तर पिके करपून जाण्याची नाहीतर मग दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता होती. खरिपाच्या हंगामात पावसाअभावी दुबार पेरणीचे मोठे संकट तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकलेले होते. परन्तु सुरु झालेल्या पावसाने ते आता टळले आहे.

२० जूनला मंडणगड तालुक्यात १५ मिलिमीटर, २१ जूनला ४३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पावसाच्या हंगामास सुरवात झाल्यापासून तालुक्यात सरासरी १०४ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. गतवर्षी म्हणजे २१ जून २०२१ ला पहिल्या २१ दिवसांत तालुक्यात ७९२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती.

यंदा रोहणी नक्षत्रवर पांरपरिक शेतीवर भर असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सालाबादप्रमाणे पेरणीस सुरवात केली; मात्र पावसाने एक दिवस येईन पुन्हा दडी मारल्याने व आगमनास नेहमीपेक्षा जास्त विलंब केल्याने शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्यास आता फुटवे येऊ लागले आहेत. त्यामुळे लावणीस विलंब होणार आहे. ऐंशीच्या दशकात वटपौर्णिमेला तालुक्यात बहुतांश ठिकाणी लावणीची कामे पूर्णत्वास आलेली असतात. जागतिक तापमानवाढ, प्रदूषण व पर्यावरणात झालेल्या बदलांचा परिणाम येथील पर्यावरणही झालेला दिसून येत आहे.

गेल्या दहा वर्षांत पावसाचे कोणतेही वेळापत्रक समान राहिलेले नाही. अतिवृष्टी, अवर्षणासारख्या प्रकाराबरोबरच पाऊस पडला तर सलग पडणे, गायब झाला तर सलग वीस वीस दिवस गायब होणे असे प्रकार होत असल्याने पर्यावरणातील बदल व अनिश्चितता लक्षात घेऊन मगच शेतीच्या कामाचे नवीन वेळापत्रक शेतकऱ्यांनी बनवणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular