28.8 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriसाखरपा येथे बिबट्याने घेतली दुचाकीवर झेप

साखरपा येथे बिबट्याने घेतली दुचाकीवर झेप

अनेकांना या मार्गावरून प्रवास करताना दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन घडून आले आहे.

तालुक्यातील साखरपा गुरववाडी येथील शशिकांत शरद लिंगायत हे बुधवारी संध्याकाळी साखरपा-गुरववाडीतून कोंडगाव येथे दुचाकीने येत असताना रस्त्याच्या बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. मात्र ही उड़ी शशिकांत लिंगायत यांनी कशी-बशी चुकवून जीवाच्या आकांताने दुचाकी वेगाने नेल्याने त्यांना स्वतःला वाचवण्यात यश आले आहे. यापूर्वी साखरपा गुरववाडी परिसरात सायंकाळच्या वेळेत बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ग्रामस्थांना ऐकू येत होता. तर अनेकांना या मार्गावरून प्रवास करताना दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन घडून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.

साखरपा गुरववाडी येथील अनेक ग्रामस्थ नोकरी, व्यवसाय तसेच खरेदीसाठी कोंडगाव बाजारपेठ येथे येत असतात. बाजारपेठेत नोकरी व व्यवसायासाठी आलेले ग्रामस्थ सायंकाळच्या सुमारास याच मार्गावरून घरी जात असतात. तसेच गुरववाडी येथून जाणारा मार्ग हा बोंड्ये-मारळ या गावांना जोडला आहे. साखरपा- कोंडगाव परिसरातील नागरिकांना बोंड्ये मारळ येथे जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर ठरतो. त्यामुळे या मार्गावरून रहदारी वाढू लागली. मात्र या परिसरात बिबट्यांचे दर्शन घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लिंगायत यांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेवून अनेकांनी या मार्गावरून सायंकाळचा प्रवास करणे टाळले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular