पृथ्वीवरचं मोठं संकट टळलं आहे. जग टेन्शनमुक्त झालं आहे. फेल झालेले नासाचे सॅटेलाईट २१ वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार होते. हे सॅटेलाईट कोसळल्यानंतर पृथ्वीवर मोठा विनाश होईल अशी भिती व्यक्त केली जात होती. कारण हे सॅटेलाईट नेमकं कुठे कोसळणार याचबाबत काहीच अंदाज लावता येत नव्हता. मात्र, आता हे सॅटेलाईट अशा ठिकाणी कोसळले आहे ज्यामुळे मनुष्याला कोणताही हानी पोहचलेली नाही. हेसी स्पेसक्राफ्ट असे या कोसळलेल्या उपग्रहाचे नाव आहे. नासाचा हा उपग्रह २१ वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २००२ मध्ये अवकाशात झेपावला होता. २१ वर्षांपूर्वी उपग्रह फ ल झाल्याने अनियंत्रित स्थिती होता. पृथ्वीच्या कक्षेत तरंगणारा हा उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली होती. १९ एप्रिल रोजी हा उपग्रह कोसळणार होता. हा उपग्रह नेमका कधी आणि कुठे कोसळेल याबाबत शास्त्रज्ञांना अंदाज लावता येत नव्हता यामुळे संपूर्ण जग चिंतेत होते.
अखेर १९ एप्रिल २०२३ रोजी उत्तर आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात हे सॅटेलाईट कोसळले आहे. छड च्या वैज्ञानिकांनी हे सॅटेलाईट सहारा वाळवंटात कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २७३ किलो वजनाचा हा उपग्रह २६ अंश रेखांश आणि २१.३ अंश अक्षांशावर हे सॅटेलाईटसहारा वाळवंटात कोसळला आहे. हे सॅटेलाईट सहारा वाळवंटात कोसळल्याने मोठी हानी टळली आहे. वाळवंटातील निर्मनुष्य ठिकाणी हे सॅटेलाईट कोसळले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. जर या उपग्रहाचे अवशेष मानवी वस्तीत कोसळल्यास मोठा विनाश होईल अशी भिती व्यक्त केली जात होती. हे सॅटेलाईट समुद्रात कोसळेल असा अंदाज देखील शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. मात्र, अखेरीस हे सॅटेलाईट वाळवंटात कोसळले आहे.