मुंबई – गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर आरवली येथील गडनदी पुलावर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्या पुलाच्या पूर्व बाजूला उभारलेल्या महामार्गावरील या पुलाचे काम आता अंतिम टप्प्याकड़े आहे. पुलावर गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले असून, दोन्ही बाजूंनी भरावाचे काम मोठ्या मशिनरीच्या साह्याने युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र आरवली येथील गटारांची कामे पावसाळा तोंडावर असतानाही हाती दि घेण्यात आली नसल्याने पावसाळ्यात हे नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. काही दिवसांपूवीच केंद्रीय रस्ते ते विकासमंत्री नितीन गड़करी यांनी हेलिकॉप्टमधून चौपदरी राष्ट्रीय महाम र्गाच्या रखडलेल्या कामाची हवाई पाहणी केली, महामार्गाच्या आरवली. ते लांजा तालुक्यातील वाकेड या पट्ट्यातील रखडलेल्या कामाने वेग घेतला आहे. दशकभरापूर्वीच ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती करण्यात येऊन त्याचे मजबतीकरण करण्यात आले आहे. या पुलाच्या बाजूलाच आता चौपदरी महामार्गावरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गर्डर चढ़वण्याचे काम पूर्ण झाले असून, आरवली बाजारपेठ तसेच चिपळूणम धील खेरशेतच्या बाजूने जवळपास पूर्ण झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गाला आरवली येथे करजुवे – माखजन ते कुंभारखर्णी- पाचांबे राजीवलीकड़े जाणारा रस्ता छेदून जात असल्याने संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे उड्डाणपूल उभारावा लागला आहे. सद्यः स्थितीत या पुलाचे थंडावलेले कामदेखील वेगाने सुरू आहे. उड्डाणपुलाच्या दोन्हीं बाजूने सव्हिस रोडचे काम झाले आहे.सध्या या सव्हिस रोडचे काम पूर्ण झाले नसले तरी कशीबशी वाहने जाऊ शकतील, इतके काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वं आरवली बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या स्हस रोडला गटाराची व्यवस्था न केल्यास व्यापाच्यांना पाणी तुंबण्याच्या सम स्येला तोंड द्यावे लागणार आहे.