26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKokanमापात पाप करणाऱ्यांवर होणार कारवाई बेकायदेशीर वजनकाटे वापरू नका

मापात पाप करणाऱ्यांवर होणार कारवाई बेकायदेशीर वजनकाटे वापरू नका

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मार्फत जुन्या वजनकाट्यांऐवजी डिजिटल वजन काटे वापरण्याच्या सूचना यापूर्वी वारंवार देण्यात आलेल्या आहेत, तसेच डिजिटल वजन काटेही योग्य वजन दाखवतात का? ते तपासण्याच्याही सूचना रायगड जिल्हा प्रशासनाकडून विक्रेत्यांना करण्यात आलेल्या आहेत; मात्र डिजिटल वजन काटे वापरणे तर सोडाच साधे वजन काटेही पुरातन काळाच्या पद्धतीने जिल्ह्यात वापरले जात आहेत. काही ठिकाणी त्याल लोहचुंबक लावून वजन काट्याच्या पातच पाप केले जात असल्याने वैध पन शास्त्र विभागाने असे बेकायदेशी वजनकाटे शोधण्याची मोहिम सुरु के आहे. जिल्ह्यात चायनामेड वजनकाट्याचे प्रमाण वाढलेले आहे, यातून सर्वसाम ान्य ग्राहकांचेही नुकसान होत असल्याने जिल्हाप्रशासनाने बेकायदेशीर वजनकाटे न वापरण्याचे आवाहन केले आहे. वैधम पन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पेण येथे कारवाई करत ६ व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली आहे.

चायनामेड वजनकाटे – व्यापारी, विक्रेते यांनी अनधिकृत, चायनीज वजनकाटे वापरू नयेत. शासकीय सील असलेल्या पडताळणी प्रमाणपत्राशिवाय इलेक्ट्रॉनिक काटे खरेदी करू नयेत, असे आवाहन उपनियंत्रक वैधमापन शास्त्र विभागाने केले आहे. शेजारच्या राज्यातून वजनकाट्यांचे सुट्टे भाग आणि वजनकाटे कमी दरात व कररहित स्वरूपात महाराष्ट्रात विकले जात आहेत. चायनामेड वजनकाटे कमी किंमतीत विकले जातात. यातून मालाचे योग्य वजन केले जात नाही. त्यामुळे स्थानिक वजनकाटे उत्पादक, दुरुस्तक व विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. तसेच राज्य शासनाचा महसूलदेखील बुडत आहे या संदर्भात दुरुस्ती परवानाधारकांन जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्य आहेत.

दुकानदारांकडून मापात पाप – दरवर्षाला वजनकाटे अधिकृत दुरुस्तक परवानाधारकांकडून छापून घ्यावे लागते. पुर्वी झीज होणारे लोखंडी वजनांमध्ये शिसे धातू टाकून वजन वाढवले जात असे. यावर वैधमापन शास्त्राचा अधिकृत शिक्का असे. यास वजन छापणे असे म्हटले जात असे. परंतु अलिकडे इलेक्ट्रॉनिक वजन यंत्र बाजारात आलेली आलेली आहेत. या यंत्रांची दुरुस्ती करण्याकडे विक्रेत्यांकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. वजन करताना प्रत्येक किलोमध्ये ५० ते १०० ग्रॅम धान्य कमी भरले तरी दिवसाला काही किलोमध्ये दुकानदारांकडे धान्य जमा होते. यातून दुकानदारांना जादा पैसे कमावता येतात; मात्र हे सर्व प्रकार बेकायदेशीर असून ग्राहकांची लुटमार करणारे आहेत.

प्रत्येक तालुक्यात शासनाचे परवानाधारक दुरुस्तक आणि विक्रेते आहेत. त्यांच्याकडून वजनकाट्यांची दुरुस्ती करुन घेणे गरजेचे आहे. प्रत्येक वजनकाट्याच्या भारण क्षमतेनुसार यासाठी शासनाला फी भरावी लागते. परंतु काहीजण दुसऱ्या राज्यातून दुरुस्तीचे साहित्य आणून वजनकाटे दुरुस्त करुन देतात. यातून शासनाची आर्थिक फसवणुक होत असते. चायनामेड वजनकाट्यांना तर आपल्याकडे मान्यताच दिलेली नाही, त्यामुळे विक्रेत्यांनी असे वजनकाटे वापरु नये, होणारी कारवाई टाळावी, असे वैध मापन शास्त्र, पेणचे उपसंचालक ए.सी. कवरे यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular