20.5 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraएसटी संपाच्या बाबतीत “प्लॅन बी” तयार - परिवहनमंत्री अनिल परब

एसटी संपाच्या बाबतीत “प्लॅन बी” तयार – परिवहनमंत्री अनिल परब

नोव्हेंबर महिन्यापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही संपुष्ट आलेला नाही. एसटी संपातुन  अजय गुजर यांच्या माध्यमातून आतापर्यंत २४ वी एसटी कामगार संघटना संपातून बाहेर पडली. मात्र तरीही राज्यभरातून आझाद मैदानात आलेले संपकरी एसटी कर्मचारी विलीनीकरणाशिवाय संप मागे घ्यायला तयार नाहीत. संप मागणी पूर्ण होईपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता हा हा संप कसा मिटवायचा! असा प्रश्न राज्य सरकारला पडला आहे.

राज्यात मागील ५५ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात काल उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि अजयकुमार गुजर यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर अजयकुमार गुजर यांनी आपण संपातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं, आणि कर्मचाऱ्यानी सुद्धा त्यांना खोत आणि पाडळकरांसारखे मुक्त केले.

परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी आज २२ डिसेंबरपर्यंत एसटीच्या संपाची नोटीस देणाऱ्या कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेतल्यामुळे राज्य सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावरील सर्व प्रकारची कारवाई मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. २२  डिसेंबरपर्यंत कामगारांनी आपापल्या आगारात हजर होणे अपेक्षित आहे, मात्र तरीही कामगारांनी यापुढे ऐकले नाही तर मात्र सरकारकडे “प्लॅन बी” तयार असल्याचे परिवहनमंत्री परब यांनी सांगितले आहे. एका वाहिनीशी बोलताना परब यांनी ‘प्लॅन बी’  तयार आहे पण तो नेमका काय आहे?  हे सांगण्यास मात्र त्यांनी तूर्तास नकार दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular