27.6 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriजनता प्राणानिशी गेल्यावर पालिका जागी होणार का? - अॅड. मांडवकर

जनता प्राणानिशी गेल्यावर पालिका जागी होणार का? – अॅड. मांडवकर

रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे. रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात कुठेतरी रस्ते आहेत अशी अवस्था शहरी भागातील रस्त्यंची आहे. बाजारपेठेमध्ये तर संपूर्ण उतार असल्याने रस्त्यावरून चालताना पण कसरत करत चालावे लागते, आणि सिव्हील हॉस्पिटल पासूनच वाहत येणारे पाणी पूर्ण बाजारपेठेत पसरते. उतरत जिथे रस्ता मिळेल तिथे पाणी शिरते. चालताना रस्तावरून चालत आहोत कि गटाराच्या पाण्यातून  हेदेखील समजत नाही.

रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील अॅड. महेंद्र मांडवकर यांनी रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबद्द्ल सरळ नगरपरिषद प्रशासनालाच नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे जर ८ दिवसांत रस्त्यांवरील खड्डे न बुजवल्यास, स्वखर्चाने शहरातील रस्त्यांवर डबर टाकण्याचा इशारा देखील अॅड. महेंद्र मांडवकर यांनी दिला आहे. सदर प्रकरणी पहिली नोटीस दि. २८/०६/२०२१ रोजी पाठवण्यात आली होती. परंतु, नगरपरिषद प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. नगरपरिषदेला जाग करण्यासाठी सोमवारी पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांच्या नावे नोटीस पाठवण्यात आली. अॅड. महेंद्र मांडवकर यांनी या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, सर्वच रस्त्यांना मोठे मोठे खड्डे पडले आहेत.आणि आता सुरु असलेल्या पावसाने खड्यात पाणी भरल्याने, वाहन चालकांना पटकन अंदाज येत नाही, खड्डा किती मोठा आहे याचा, एखाद्या वेळेस या खड्डेमय रस्त्यामुळे लहान मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. एखादा मोठा अपघात होऊन जिवीतहानी झाल्यावर शासनाला जाग येणार आहे का? जनता प्राणानिशी गेली तर जबाबदार कोण? असा रोखठोक सवाल देखील अॅड. मांडवकर यांनी प्रशासानाला केला आहे.

पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी रस्ते खोदण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरांतील रस्ते  चिखलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जनतेकडून कर स्वरुपात प्रचंड रक्कम पालिकेकडे जमा केली जाते. तेच जर एखाद्याने कर भरला नाही, तर ज्या तत्परतेने कारवाईचा बडगा उगारला जातो, त्याच वेगवान पद्धतीने कामाची पूर्तता करण्यास तत्परता दाखविली तर रत्नागिरीकरांसाठी हीताचे ठरेल. डांबरीकरणाचे काम पावसात होणे शक्य नाही, हे समजू शकतो पण खोदलेल्या गॅस आणि पाणी पाईप लाईनसाठी ठेकेदार कंपनीवर पालिकेचे नियंत्रण असणे गरजेचे असल्याचे अॅड. मांडवकर म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular