26.8 C
Ratnagiri
Saturday, May 10, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeKokanपर्यटन निरीक्षक अ‍ॅड. विलास पाटणे यांच्या नजरेतून सागरी मार्ग

पर्यटन निरीक्षक अ‍ॅड. विलास पाटणे यांच्या नजरेतून सागरी मार्ग

कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे, समुद्रकिनारे, किल्ले किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणामध्ये सागरी मार्गे दाखल होऊ शकतील.

कोकण किनारपट्टीला लाभलेल्या अथांग समुद्रकिनाऱ्यामुळे सागरी मार्गे वाहतूक लवकरात लवकर सुरु होणे फार गरजेचे आहे. सध्या रेल्वे आणि महामार्ग यांच्या माध्यमातून प्रवास होत आहे. विमान सेवा लवकरात लवकर कार्यरत होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे पर्यटनदृष्ट्या सुद्धा सागरी मार्गे वाहतूक सुरु करणे फायदेशीर ठरणार आहे.

पर्यटन निरीक्षक अ‍ॅड. विलास पाटणे यांनी या  सागरी वाहतुकीबद्दल स्वतः:चा अनुभव सांगितला आहे. कोकणपट्टीतील डोंगराळ भागातील ४२ खाडयांनी व्यापलेल्या ५४० किलोमीटरच्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे मुंबईचे सध्याचे अंतर १०५ किमीने कमी होऊन प्रवासाच्या वेळेमध्ये किमान एक ते दीड तासांचा फरक पडणार आहे. त्यामुळे हा मार्ग लवकरात पूर्ण होत नाही, तोपर्यंत पर्यटन विकासाला चालना मिळणार नाही.

अ‍ॅड. पाटणे यांनी हरीहरेश्‍वर येथे प्रवास करताना आलेल्या अनुभवानंतर शासनाकडून काय करणे अपेक्षित आहे, याबाबत पत्रकारांशी मनमोकळेपणे व्यक्त झाले. ते म्हणाले कि,  कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे, समुद्रकिनारे, किल्ले किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणामध्ये सागरी मार्गे दाखल होऊ शकतील. स्थानिक आंबा, काजू आणि मत्स्यव्यवसायाला गती मिळेल.

राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने सागरी महामार्गाच महत्त्व अधिक आहे. युती सरकारमध्ये गडकरी बांधकाम मंत्री असताना ८ पूलांनी मार्गी लावले. जयगड व दाभोळ, दिघी-आगरदांडा,  बाणकोट-बागमांडले  हे पूल राष्ट्रीय ग्रामीण विकास बँकेकडे प्रस्तावित आहेत. २०१३ साली नाबार्डकडून वेसवी-बांगंमांडला पूल अर्थसहाय्य मिळून देखील अद्याप काम रखडले आहे. जयगडऐवजी १० किमी अंतरावरील कुंडली-जांभारी पूल प्रस्तावित आहे. विजयदुर्गऐवजी सागवे आंबेरी पूर्ण झाला आहे.

महामार्गावरील सर्वात मोठा पूल रेवस-कारंजा हा पूर्णपणे खाजगीकरणातून पूर्ण करणे हाच पर्याय शासनासमोर उपलब्ध आहे. जयगडऐवजी १७ किमी अंतरावरील राई-भातगाव,  दाभोळ ऐवजी ८ किमी अंतरावरील प्रस्तावित साखरी त्रिशुळ (गुहागर), बाणकोट ऐवजी २५ किमी म्हाप्रळ पुलावरुन जाणा-या मार्गाला सागरी महामार्ग म्हणणे संयुक्तीक नाही. तोही पुल सध्या नादुरुस्त अवस्थेत आहे. २३ ऑक्टोबर २०२० च्या पत्राने सागरी महामार्ग पुन्हा राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुपुर्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सागरी मार्गाने वाहतूक सुरु होणे आवश्यकच आहे.

RELATED ARTICLES

Most Popular