26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraराज्यातील अफगाण मुलांच्या संकटकाळी राज्यसरकार पाठीशी – नाम. सामंत

राज्यातील अफगाण मुलांच्या संकटकाळी राज्यसरकार पाठीशी – नाम. सामंत

अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली भयावह परिस्थिती लक्षात घेता, राज्यामध्ये शिक्षणासाठी दाखल झालेल्या अफगाण मुलांना त्यांच्या कुटुंबाची चिंता लागून राहिली आहे. महाराष्ट्रातील अफगाण विद्यार्थ्यासोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सरहद संस्थेच्यावतीने आयोजित ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी येथे संवाद साधला. यावेळी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष मालोजीराजे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार,  किरण साळी, अफगाणी विद्यार्थी प्रतिनिधी महमद अफगाणी यांच्यासह इतर अफगाणी विद्यार्थी उपस्थित होते.

महंमद अफगाणी यांनी पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्याची मागणी केली असून, जेवण व निवासाची व्यवस्थेसाठी आर्थिक मदत देखील करावी अशी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता स्थापन केल्याने जगणे अतिशय कठीण बनणार आहे. कुटुंबाशी काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने अनेक जण चिंतातूर झाले असून, भारतात असल्याने आपण सुरक्षित आहोत पण पुढे काय! अशी चिंता त्यांना सतावत आहे. परंतु, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्ट्रात शिकायला आहेत, त्यांना मानसिक आधार देऊन त्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन, पुढील निर्णयाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पुढे म्हणाले कि, अफगाणिस्तानातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होणार नाही. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या लक्षात घेता सगळ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आवश्यक  मदत करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular