23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeIndiaअ‍ॅम्ब्युलन्स सायरनचा आवाज बदलण्याची घोषणा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अ‍ॅम्ब्युलन्स सायरनचा आवाज बदलण्याची घोषणा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण विनाकारण कर्कश हॉर्न वाजवताना दिसून येतात.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच दिलेल्या ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील सर्व गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न बदलून भारतीय वाद्यांचे सुमधूर आवाज असलेले हॉर्न लवकरच लावण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स सायरनचा आवाज बदलण्याची घोषणा केली आहे. लवकरच या संदर्भात आदेश काढण्यात येणार असल्याचंही गडकरींनी पुण्यातील एका  कार्यक्रमा अंतर्गत म्हटलं आहे.

नितीन गडकरी यांनी स्वानुभव कथन केला आहे, ते म्हणाले कि, मी नागपुरमध्ये १८ व्या मजल्यावर फ्लॅट मध्ये राहतो. सकाळी रोज एक तास प्राणायम करतो,  तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात की या कर्कश आवाजामुळे किती त्रास सहन करावा लागतो! मेडिकल सायन्सनुसार त्याचा आपल्यावर एक प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा होत आहे. डॉक्टरची भरमसाठ बिलं आपल्याला भरायला लागतात त्यामागचे कारण वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हेच आहे.

मी आता एक ऑर्डर काढणार आहे की, एका जर्मन संगीतकारने आपल्याकडे आकाशवाणीची एक ट्यून बनवली होती. सकाळी ती ट्यून वाजायची. मी आता ती ट्यून शोधून काढली आहे आणि म्हटलं अ‍ॅम्ब्युलन्सवर ही ट्यून लावावी, कानाला ती चांगली वाटते.

वायू प्रदुषणासोबत सध्या ध्वनी प्रदुषणदेखील प्रचंड प्रमाणात वाढत असून, अनेक वाहनचालक त्यांच्या गाडीला मुद्दामच मोठ्या आवाजाचे हॉर्न बसवून घेतात. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण विनाकारण कर्कश हॉर्न वाजवताना दिसून येतात. अनेकदा या मोठ्या हॉर्नच्या आवाजामुळे वाहनचालकांचं वाहनावरचं नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत.

या दुर्घटना टाळण्यासाठी आता कर्कश ह़ॉर्नच्या ऐवजी भारतीय वाद्यांचा वापर करता येईल का, याचा विचार करण्याचे आदेश वाहतूक मंत्रालयाला देणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलेलं.

RELATED ARTICLES

Most Popular