येत्या टी-२० विश्वचषकानंतर कर्णधार विराट कोहली एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्मावर कर्णधार पदाची धुरा सोपवली जाणार असल्याचे वृत्त मिळाले आहे. विराट कोहलीकडे तीनही प्रकारचे कर्णधारपद असल्याने त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होताना दिसून येत आहे. काही जाणकारांनीसुद्धा असे मत व्यक्त केले आहे कि, विराटने कर्णधारपदाचा राजीनामा दिला तर ते त्याच्या फलंदाजीसाठी उत्तम ठरु शकत.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर, विराट कोहलीने टी-२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीने या विषयावर संघ व्यवस्थापन आणि रोहित शर्मा बरोबर अनेकदा चर्चा मसलत केल्याची माहिती मिळाली आहे.
विराट कोहली जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराटने आपल्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजले आहे. मात्र विराटने कसोटी संघाचे नेतृत्व आपल्याकडेच ठेवण्याचं ठरवलं असल्याचीही माहिती दिली आहे. व ज्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या जागी रोहित शर्माची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्णधार पदासाठी विराट कोहली नंतर रोहित शर्माच योग्य असल्याचे समजले जात आहे. आयपीएल सामान्याच्या वेळी रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पाच वेळा आयपीएल सामान्यांमध्ये विजय मिळविला आहे. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपले कर्णधारपद सोडणार असून, विराटच्या जागी रोहित शर्माच्या खांद्यावर टी-२० आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली जाऊ शकण्याची शक्यता आहे.