26.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriकोरे भरतीसाठी प्रकल्पग्रस्तांना वयामध्ये सवलत मिळण्याची मागणी

कोरे भरतीसाठी प्रकल्पग्रस्तांना वयामध्ये सवलत मिळण्याची मागणी

कोकण रेल्वे भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना वयामध्ये सवलत देण्यात यावी, यासाठी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीतर्फे मागणी करण्यात आली आहे. कोकण रेल्वेमध्ये एनआरएमयुची संघटना बरीच वर्षे कार्यरत असून, कोकण रेल्वे एम्प्लॉइजची निवडणूक झाल्यानंतर सदरचा प्रश्न सोडवण्यात यावा, अशीही मागणी केली गेली आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी शासन जर वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेत असेल तर, या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने देखील प्रकल्पग्रस्तांना १० वर्षांची वयोमर्यादा वाढवून द्यावी, जेणेकरून भरतीच्या प्रश्नामध्ये कोकणातील तरुणांना सुद्धा संधी मिळेल. कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती वारंवार कोकण रेल्वे समोर प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडत आले आहे, परंतु, अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नसून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असून कोणीही प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी कित्येक वर्षे सरळ मार्गाने लढा सुरु आहे.

कोकण रेल्वे कामगार संघटनांची निवडणूक या आठवड्यामध्ये असून, या निवडणुकीमध्ये कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियन आणि कोकण रेल्वे कामगार सेना यांची युती असून ते एकत्रितपणे लढत आहेत. कोकण रेल्वेमध्ये बरेच वर्षे सत्तेत असलेली एनआरएमयुची संघटनेने भरतीच्या प्रश्नामध्ये प्रकल्पग्रस्त कोकणवासीयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने, नव्याने होणाऱ्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यांच्याकडून हा प्रकल्पग्रस्त कोकणी माणसाच्या नोकरीचा तिढा सुटला, तर नक्कीच ही बाब कोकणवासियांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

कोरोनाचे देशव्यापी संकट आणि चुकीच्या नियमांमुळे अनेक प्रकल्पग्रस्त असून सुद्धा त्यांना नोकरी मिळणे दुरपास्त झाले आहे. त्यामुळे या सगळ्याचा सारासार विचार करून, प्रकल्पग्रस्तांच्या वयाचा विचार करून, त्यामध्ये इतर स्पर्धा परीक्षा किंवा त्याप्रकारच्या इतर परीक्षेमध्ये वयात सुट मिळत असेल तर, प्रकल्पग्रस्तांना सुद्धा मिळावी अशी मागणी कोकण रेल्वेकडे जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular