27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeChiplunअरे तुमच्या बापाचा… घरचा पैसा आहे का? 'लाडकी बहीण' वरुन अजितदादांचा सवाल

अरे तुमच्या बापाचा… घरचा पैसा आहे का? ‘लाडकी बहीण’ वरुन अजितदादांचा सवाल

पैशात वाढ करण्याचा प्रयत्न करू या साठी शेखर निकमना पुन्हा आमदार करा.

लाडकी बहीण योजनेची विरोधकांनी चेष्टा केली… असे पैसे कोण देतो का ?… आम्ही पैसे दिले आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यां विरोधकांनी कोर्टात धाव घेऊन योजना बंद करण्याचा प्रयत्न केला… अरे तुमच्या बापाचा… घरचा पैसा आहे का?… ही योजना कोणीही बंद करू शकत नाही. उलट आम्ही या पुढच्या काळात या पैशात वाढ करण्याचा प्रयत्न करू या साठी शेखर निकमना पुन्हा आमदार करा, असे आवाहन हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायला राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी केले.

राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची जनसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा आज श्रीवर्धन येथून सुरू झाला. दुपार नंतर ही यात्रा चिपळूणमध्ये दाखल झाली. यात्रेला आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. न भूतो अशी गर्दी आज चिपळूण मध्ये उसळली होती सावर्डे येथे आगमन झाल्या नंतर ना. अजितदादा खा. सुनील तटकरे, महिला अध्यक्षा सौ. रुपाली चकणकर आ. शेखर निकम आदी मान्यवर आज भव्य मिरवणुकीने सावर्डे येथून चिपळूण सभास्थळी दाखल झाले. ढोल ताशा आणि प्रचंड फटाक्यांची आतषबाजी करीत बहादूरशेख नाका येथून सभास्थळी दाखल झाले.

खोटे पण रेटून बोल – ना. अजितदादा पवार यांनी आज जोरदार भाषण केले. या वेळी ते म्हणाले की, आपल्याला कोणत्या मार्गाने महाराष्ट्र घेऊन जायचा आहे याचा विचार झाला पाहिजे. विरोधक हे टीका करणारच मात्र टिकेत सत्यता असली पाहिजे मी ही विरोधी पक्षनेता होतो मात्र आता विरोधक खोटे पण. रेटून बोलत आहेत, अशी टीका या पूर्वी झाली नव्हती. निव्वळ खोटा अपप्रचार केला जात असल्याचे ना. अजितदादा पवार यांनी सांगितले.

मोकळ्या हाताने गेला नाही – चिपळूण संगमेश्वरसाठी कोरोना वगळता उर्वरित वर्षात शेखर निकमांनी पाठपुरावा करीत मोठ्या प्रमाणात निधी आणला. तो आला, त्याने मागितले आणि तो मोकळ्या हाताने परत कधी गेला नाही असे कधी घडले नाही या मतदार संघासाठी शेखर निकम यांनी अडीच हजार कोटी रुपये विकासाठी आणले आहेत या पट्ट्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक कामे या मतदार संघात झाल्याचे ना अजितदादा पवार यांनी सांगितले

शब्द हाच वादा – जो जो शब्द… वादा आपण केला तो तो पूर्ण केला आहे वाशिष्ठी गाळाने भरली होती. माझं चिपळूण दरवर्षी पुरात जाते दादा हे कधी थांबणार असे शेखर सारखा टाहो फोडत होता हा गाळ काढण्यासाठी फक्त पंधरा कोटी रुपयांचं डिझेल लागले आहे. अजूनही गाळ आहे. संपूर्ण गाळ काढला जाईल. अजूनही काही प्रलंबित कामे आहेत, ती ही मार्गी लागतील. हा माझा शब्द आहे. मी दिलेला शब्द नक्कीच पुरा करतो, असे ना अजितदादा पवार यांनी सांगितले

दोन हजार कोटी देणार! – चिपळूणमध्ये रेड ब्लु लाईन पुरनियंत्रणासाठी आमचे सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू आहेत. चिपळूणसाठी दोन हजार कोटीचा प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच याला मंजुरी देऊन येथील पुराचा प्रश्न आपण कायमस्वरूपी निकालात काढणार असल्याचे सांगितले. त्याच सोबत येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी काम केलं जाणार आहे मात्र येथील पुराचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढणार हा माझा शब्द आहे, असे ना अजितदादा पवार यांनी स्पष्ठ केले. विकासाची कामे ही होतच राहणार आहेत मात्र या पुढे येथील तरुण तरुणींच्या हाताला काम देण्याची येथील बेरोजगारी दूर करण्यासाठी या ठिकाणी नवनवीन उधोग धंदे कारखानदारी आणणार असल्याचे नां अजितदादा पवार यांनी सांगताच एकच जयघोष करण्यात आला

लाडकी बहीण योजना आम्ही आणली टीका झाली. विरोधक कोर्टात गेले. योजना बंद कशी होईल या साठीं प्रयत्न केले मात्र आम्ही डायरेक्ट पैसे आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले. मधे गळती नाही, थेट पैसेच माझ्या बहिणीच्या हाती देण्याचे काम आम्ही केल्याचे ना. अजितदादा पवार यांनी या वेळी सांगितले. चोवीस तास माझी माय माऊली काम करते आहे तिला मदत नको का करायला एक सांगतो योजना कायमस्वरूपी चालवायची आहे पुन्हा योजनेच्या पैशात वाढ करायची आहे. या साठी शेखर निकम याच्या घड्याळ निशानीवर मत द्या असे आवाहन ना अजितदादा पवार यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular