जमीन म्हणजे काय असते हे तुम्हाला तमाम महाराष्ट्र दाखवून देईल – ठाकरेंचा भाजपाला इशारा

67
Thackeray's warning to BJP

बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी, आरएसएस, अमित शहा, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, नारायण राणे या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह महाआघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

बारसु पाकव्याप्त काश्मीर नाही –  बारसु रिफायनरी प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणाविरोधात बोलताना म्हणाले की, बारसु हा काही पाकव्याप्त काश्मीर नाही. या ठिकाणी संपूर्ण पोलीस दल सर्वसामान्य नागरिकांच्या उभे केले आहेत. मी पत्र दिले होते. मात्र, तिथे लाठीमार करा असे पत्र दिले होते का? बारसूमध्ये अत्याचार करून प्रकल्प करा, असे पत्र दिले होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ६ मे रोजी कोकणच्या दौऱ्यावर आपण येणार असून यावेळी बारसूत जाणार असल्याचे ते म्हणाले.

मोरारजी नावाचा नरराक्षस –  मुंबईची सोन्यासारखी जमीन बुलेट ट्रेनच्या घशात घातली, असा आरोपही त्यांनी केला. बुलेट ट्रेनसाठी किती खोके घेतले होते, असा सवाल त्यांनी केला. तसेच कारशेडला विरोध नाही. मात्र, आरेच्या जागेला विरोध असल्याचे सांगितले. मोरारजी देसाई नावाच्या नरराक्षसाने गोळीबाराचे आदेश दिले. इमारतीवर अश्रुधुरांचा मारा केला. मात्र, मुंबईसाठी महिलांनी पुढे आल्या. गोळ्या आमच्यावर झाडा म्हणाल्या. मिंध्यांनी त्यांचे काही तरी घ्यावे. विषय बरेच आहेत.

टिनपाटांना बुचं घाला – कर्नाटकची निवडणूक रंगात आलेली आहे. पंतप्रधान म्हणाले काँग्रेसने आपल्याला ९१ वेळा शिव्या दिल्या. मी शिव्या देण्याचे समर्थन करत नाही. तुम्हाला वाटते काँग्रेस तुम्हाला शिव्या. देते. मात्र, तुमचे टीनपाटे आम्हाला भोके पडेस्तोर बोलतात, ते तुम्हाला दिसत नाही. तुम्ही त्या टीनपाटांना बुचं घाला. मग सगळे चांगले होईल. तुमची लोके बोलली, तर आमची लोके बोलणारच, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ? –  तुम्हाला जाहिरातबाजी करायची आहे तर २०१४ चीच करा. जी आश्वासने तुम्ही त्यावेळी निवडणुकीत दिली होतीत त्या सर्व जाहिरातींची टेप लावा. मग महाराष्ट्रातील जनतेलाही समजेल, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा विचारा भाजपवाल्यांना असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

राजधानी आंदण नाही –  आपली राजधानी आंदण मिळालेली नाही. ती लढून मिळालेली • आहे. मध्यरात्री हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करून आलो. यावेळी शिवसैनिकांनी सांगितलेले धक्कादायक होते. आम्ही पोहचलो तोपर्यंत हुतात्मा चौकात सरकारतर्फे कोणीही पोहचले नव्हते. आज सकाळी मात्र हे मिंधे तिकडे गेले असतील. ही मानवंदना देताना त्यांना एक सांगायचे आहे, यांनी जर का त्यावेळेला मुंबई लढा दिला नसता. तर आज गद्दारी करून का होईना, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

नवा हिंद केसरी मिळाला : अजित पवार – यावेळी अजित पवार यांनीही सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला. मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा नवा हिंद। केसरी महाराष्ट्राला मिळालां. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दीडशे बैठका घेतल्या. असे मी नाही, तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले. असे सरकार तुम्ही पाडायला लागला, तर देशात लोकशाही कशी राहणार. सत्ता येते आणि जाते. मात्र, जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले. पर्यटन विभागाने काल जाहिरात दिली. देखो आपला महाराष्ट्र. या सरकारला मराठी भाषेची अडचण “निर्माण झाली आहे का? हे देखो कुठले काढले? पाहा आपला महाराष्ट्र म्हणाना. आता यांनाच पाहायची वेळ आली आहे, असा इशारा यावेळी अजित पवार यांनी दिला. सरकारला मस्तवालपणा आलाय. सरकार महापालिका, नगरपालिकाच्या द निवडणुका का जाहीर करत नाही. ६ निवडणुकाची भीतीसरकारलाकशासाठी 7 आहे? निवडणुका जाहीर झाल्या, तर जनता काय करेल याची भीती वाटते. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपसूक म्हटले. असे कोणत्याही सरकारला म्हटले नाही. मात्र, याचे सरकारला काहीही वाटत नाही, अस – हल्लाबोल अजित पवार यांनी केला. मुंबई सहजासहजी मिळाली नाही. तिच्यासाठी अनेकांनी ‘बलिदान दिले. मुंबईचे मराठीपण टिकवण्या आणि मुंबईचा मान-सन्मान वाढवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. अ शिवसेनेमुळे मुंबई टिकली. हेच म नेमके काहींच्या डोळ्यांवर आले. काही लोकांना फोडण्याचे राजकारण झाले. असे झाले तर बाबासाहेबांचे संविधान, कायदा राहणार आहे का, याचा विचार केला पाहिजे. हे सरकार आल्यापासून कोणत्याही निवडणुका बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीने यश मिळवले. जनता आपल्याबरोबर आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.

हे ट्रिपल इंजिन : अशोक चव्हाण –  सगळीकडे डबल- इंजीनची चर्चा आहे. आता हे ट्रिपल इंजीन हवे म्हणतात. मात्र, आपले इंजीन ताकदीचे आहे. ज्यांचे इंजीन कमजोर आहे, त्यांना तीन तीन इंजीन लागतात. यांचे ट्रिपल इंजीन नेमके कोणत्या दिशेने जाईल सांगता येत नाही. जीएसटी, नोटाबंदी, महागाई, बेरोजगारी यांचे इंजीन कोणत्या दिशेने जाईल हे काही खरे नाही. यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्र, देशाच्या हिताचे आहेत का? यांना मुंबई महापालिकेचे ९२ हजार कोटींचे फिक्स डिपॉझिट तोडायचे आहे म्हणून महापालिका हवी आहे. यांचे इंजीन चीनच्या घुसखोरीबद्दल काही बोलत नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजप आणि शिंदे सरकारव केली.

संविधान संपविण्यासाठी निघालेत :नाना पटोले –  राज्यात शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. हे सरकार मूठभर लोकांसाठी नाही. जीएसटीद्वारे सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. तर अदानींना सूट मिळते. सरकारने अदानींसाठी काम करण्याऐवजी एकशे चाळीस कोटी लोकांसाठी काम केले पाहिजे. हे संविधान संपविण्यासाठी निघाले आहेत. हे हुकूमशाही सरकार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. भाजप शेतकरी, मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या विरोधातले आहे. त्यामुळेच बाजार समितीमधला निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आला, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

भाजपची वॉशिंगमशिन : राऊत – छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि मी आम्ही आत जाऊन बाहेर आलो आहोत. आता कोणाच्या बापाला घाबरत नाही. आंदोलन केले की जेलमध्ये टाकले जाते आहे. मात्र, आम्ही कोणालाही घाबरणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. देश लुटणारे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ झाले. सकाळचा गद्दार भाजपमध्ये गेल्यानंतर देशभक्त कसा होतो, असा सवाल संजय राऊत यांनी केला.