मुदत संपताच अंधार पडूनही सारे ग्रामस्थ सरसावले, रिफायनरी विरोधी आंदोलन पुन्हा सुरु

74
Anti-refinery agitation resumed

बारसू रिफायनरी आंदोलकांनी प्रशासनाकडे केलेल्या मागण्या मान्य न झाल्याने अखेर गेले तीन दिवस स्थगित करण्यात आलेले बारसू रिफायनरी विरोधी आंदोलन सोमवारी सायंकाळपासून आता पुन्हा सुरु झाले आहे. ‘आम्ही पुन्हा आलोत, रिफायनरी रद्द केल्या शिवाय हटणार नाही’, असा नारा देत हे आंदोलन पुन्हा सुरू केले. कोकणातील माणसं कशी चिवट आहेत याची जाणीव करून शासनाला करुन देण्याचा संकल्प करण्यात आला. प्रस्तावित बारसू माती सर्वेक्षण प्रशासनाने पोलीस – बंदोबस्तात काम सुरू केले. प्रशासनाचा मनाई आदेश झुगारून आंदोलकांनी आक्रमक होऊन काम थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने आंदोलकांशी बोलण्याची तयारी दाखवल्याने आंदोलकांनी दि.२८ रोजी पासून तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलकांनी बारसू सड्यावर रिफायनरी प्रकल्पाचे सुरू असलेले काम थांबवावे, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊन तालुका, जिल्हा बंदी मागे घ्यावी आणि जमाव बंदी तसेच पोलीस बंदोबस्तात मागे घेतल्या नंतर प्रशासना बरोबर चर्चा करु असे सांगून आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित केले होते.

मात्र, आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले त्यामुळे सोमवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान बारसू सड्याव आंदोलक एकत्र जमले आणि पुन्हा एकदा रिफायनरी विरोधी संघर्ष सुरू करण्याचा नारा दिला. आता रिफायनरी विरोध आंदोलन आक्रमकपणे चालू ठेवून कोकणी माणूस कर चिवट आहे, हे प्रशासनाला दाखवून देण्याचा निर्धार केला.