25.2 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeTechnologyडॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशनशिवाय अ‍ॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री

डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशनशिवाय अ‍ॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री

गुप्तचर अधिकार्‍यांनी कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन न देता ग्राहक असल्याचे भासवत या एमटीपी किटची ऑर्डर दिली.

अ‍ॅमेझॉनविरोधात मुंबईच्या वांद्रेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री केल्याचं उघड झाल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई केली आहे. गर्भपात करण्यासाठी औषधांची विक्री करण्यासाठी डॉक्टरांची प्रीस्क्रिपशन गरजेची असते. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र अ‍ॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री सर्हासपणे होत असल्याचं आढळल्याने अन्न आणि प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उभारला आहे.

अ‍ॅमेझॉनविरोधात वांद्रे येथील खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गर्भपात करण्यासाठीची औषधांची ऑनलाईन पोर्टलवर विना डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशनशिवाय सर्रास विक्री होत असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षणात आलं. यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने अ‍ॅमेझॉनवर गर्भपात करण्यासाठीची औषधे ऑनलाईन मागवली. यानंतर ही औषधे कुरिअरद्वारे उपलब्ध झाली. यानंतर अन्न आणि प्रशासनाने अ‍ॅमेझॉन विरोधात गुन्ह्याची नोंद केली.

गर्भपात करण्यासाठीची औषधांची विकण्यासाठी विक्रेत्यांना त्याचे प्लॅटफॉर्म वापरण्याची जाहिरात आणि परवानगी देण्यासाठी औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

‘ए केअर’ या ब्रँडच्या नावाच्या कंपनीकडून अ‍ॅमेझॉन गर्भपात करण्यासाठीची औषधाची म्हणजेच एमटीपी किटची विक्री सुरु होती. गुप्तचर अधिकार्‍यांनी कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन न देता ग्राहक असल्याचे भासवत या एमटीपी किटची ऑर्डर दिली. विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-कॉमर्स पोर्टल अ‍ॅमेझॉनवर एमटीपी किट विक्रीचा केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली. गुप्तचर शाखेचे सहाय्यक आयुक्त गणेश रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन पोर्टलवर अनेक नियमांचे उल्लंघन करून औषधांचा पुरवठा केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular