रिफायनरी हटाव – कोकण बचाव अशा घोषणा देत बारसू गावांमध्ये निघाली प्रभातफेरी

98
Refinery removal - Konkan rescue

एकच जिद्द रिफायनरी रद्द, रिफायनरी हटवा, कोकण वाचवा, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची….’, अशा घोषणा देत बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने रिफायनरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावातील प्रत्येकं वाड्यांमधून मंगळवारी प्रभात फेरी काढत सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला. या प्रभात फेरीत शेकडो महिला, पुरुष, लहान मुलांसह तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या.रिफायनरी प्रकल्पाविरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनाकडून आंदोलकांचा एका अर्थाने छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून त्याच्या निषेधार्थ गोवळमध्ये प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये निघाली प्रभातफेरी सोमवारी उपोषणही करण्यात आले. प्रशासनाने ही दडपशाही थांबवावी तसेच बारस-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्यासह ७ आंदोलकांवर केलेली कारवाई मागे घ्यावीया २ प्रमुखमागण्यांसाठी मंगळवारी बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनांच्यावतीने प्रभातफेऱ्या काढण्यात आल्या.

जोरदार घोषणाबाजी – शिवणे खुर्द, सोड्येवाडी, राघव वाडी, गोवळ, पन्हळे तर्फ राजापूर आदी अनेक ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत प्रभात फेऱ्या निघाल्या. आंदोलकांचे रिफायनरी प्रकल्पाला समर्थन मिळावे यासाठी प्रशासनाची दडपशाही सुरू असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. प्रशासनाने पोलिसांचा आधार घेत बारसू रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध मावळावा यासाठी प्रयत्न केले तरी स्थानिक जनतेचा रिफायनरीला असलेला विरोध कायम आहे. सोमवारी उपोषण करून हा विरोध दर्शविण्यात आला. या उपोषणस्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्याविरोधातील पोस्टर्स झळकवत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. सोमवारच्या या आंदोलनानंतर मंगळवारी अनेक गावांमध्ये प्रभातफेरी आयोजित करत प्रकल्पाला असलेला विरोध कायम असल्याचे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी दाखवून दिले.