26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeMaharashtraपंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट...

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

नित्यपूजा झाल्यानंतर वरील प्रमाणे सोन्याचा पोषाख श्रीस परिधान करण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर भाविकाकडून सोन्याचा पोषाख व चांदीने मढविलेले सागवाणी लाकडाचे पाट अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठलासाठी तांबड्या रंगाची वेलवेट अंगी, अंगीच्या गळ्याला ३ पदरी मोत्याची माळ, गळपट्टीला सोन्याची चैन, खांद्याला दोन बाजूबंद, बंधाला मोत्याचे लटकन व सोने, दोन्ही हाताला ब्रेसलेट, प्रमाणित गोल मोत्याचे मणी व यामध्ये कौस्तुक मण्यासारखा मध्यभागी हिरवा मणी तसेच आंबा कलरचा शेला, त्यामध्ये मोत्याच्या सुरमण्या, त्यास सोन्या व मोत्याचे पूर्णपणे वर्क आहे. श्री रूक्मिणीमातेसाठी आंबा कलरची सिल्क पैठणी, सोन्याची ठुसी, मंगलसुत्र, जोडवे, पैजन, बांगड्या, नथ इत्यादी सौभाग्यचं लेणं अर्पण केले आहे. याशिवाय, दोन सागवानी पाट चांदीने मढवून दिले आहेत. श्रींच्या पोषाखासाठी १० तोळे सोन्याचा वापर करून, त्यासाठी सुमारे ११ लक्ष तसेच चांदीच्या पाटासाठी ४ किलो चांदीचा वापर व त्यासाठी ४ लक्ष रूपयाचा खर्च आला आहे.

सद्यस्थितीत, आषाढी यात्रेचा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मंदिर परिसर व दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या यात्रेचा मुख्य सोहळा रविवार दिनांक ०६ जुलै रोजी संपन्न होत आहे. या दिवशी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची नित्यपूजा झाल्यानंतर वरील प्रमाणे सोन्याचा पोषाख श्रीस परिधान करण्यात येणार आहे. संबंधित देणगीदार हे श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे निस्सिम भक्त आहेत. यापूर्वी त्यांनी श्रींच्या चरणी चांदीची कळशी भेट दिली होती असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

RELATED ARTICLES

Most Popular