22.3 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeKhedखेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलेल्या दाव्याने खळबळ

खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलेल्या दाव्याने खळबळ

वैभव खेडेकर यांनी केलेल्या या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी राज्याचे परिवहवन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या संदर्भातील किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले आहेत, त्या प्रकरणामध्ये आता मनसेने शिरकाव करत मोठा दावा केला आहे.

त्यांनी दाव्यात पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यात म्हटले आहे कि, जेष्ट शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी हे सर्व कृत्य केले आहे. इतकेच नाही तर कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या बाबतची सखोल माहिती रामदास कदम यांनी मिळवली. आणि मग ती माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे सुपूर्द केल्याचा खळबळजनक दावा मनसे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.

वैभव खेडेकर यांनी केलेल्या या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असून सुद्धा स्वत:च्या पक्षाचे, म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील खेडेकर म्हणाले आहेत. रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी कदमांच्या देखील बेकायदेशीर संपत्तीची माहिती जगासमोर उघड करावी, असे आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे पुढे खेडेकर यांनी सांगितले कि, कदम यांना शिवसेना पक्षात काही किंमत नाही. मातोश्री वर त्यांना कोण विचारत नाही, यामुळेच त्यांची रवानगी जामगे येथे केली गेली आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सूचक वक्तव्य केले आहे कि, शिवसेना व रामदास कदम यानी माझ्यावर राजकीय दबाव टाकून येथील राजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायालयाने मला दिलासा दिल्याने यांचे प्रयत्न हर तर्हेने फसले असल्याचा आरोप केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular