भाजप नेते किरीट सोमय्या आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये सुरु असलेली धुसपूस आत्ता अजूनच लयाला गेली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या बनावट आरोपांवरून अनिल परब हे आक्रमक झाले असून त्यांनी किरीट सोमय्या यांना ७२ तासाची मुदत दिली आहे.
अनिल परब यांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केलेली. परिवहन विभाग बदली प्रकरण, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनिल परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्याचप्रमाणे अनधिकृतपणे कार्यालय बांधून त्याचा सर्हास वापर केला जात आहे. किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये परब हे स्वत: मंत्री असून, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर रिसॉर्ट त्यांनी बांधलं कसे! आणि त्याचा मालमत्ता करही भरला गेला आहे. अनिल परब यांच्या केलेल्या बेकायदेशीर कामावर कारवाईचे आदेश दिले गेले असून अशी व्यक्ती अजूनही मंत्रिमंडळात कशी काय राहू शकते?
परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या हे आपल्यावर करत असलेले आरोप तथ्यहीन असून, केवळ राजकीय स्वार्थापोटी हे सर्व केले गेलेले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांचं पुराव्यांसह स्पष्टीकरण द्यावं अन्यथा त्यांच्यावर १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा वकिलांमार्फत किरीट सोमय्यांनावर करणार अशी नोटीस पाठवली आहे. त्याबद्दल त्यांनी ७२ तासांमध्ये लेखी माफी मागावी अन्यथा १०० कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार, असा सूचक इशाराच परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिला आहे.
सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून अनिल परब यांनी ते फेटाळून लावले असून, अनिल परब यांनी अॅड. सिंग यांच्यामार्फत किरीट सोमय्या यांना नोटीस धाडली आहे. सोमय्या हे मे २०२१ पासून राजकीय वैमनस्य ठेवून आणि वैयक्तिक सूडातून आपल्यावर सोशल मीडियावरून आरोप करून प्रतिमा मलिन करत असून, त्यांच्या आरोपांमुळे यांच्या वैयक्तिक व सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचत आहे असे परबांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.