26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriआंजणारीचा पूल धोकादायक, तरीही वाहतूक

आंजणारीचा पूल धोकादायक, तरीही वाहतूक

आंजणारी पूल जीर्ण झाल्याचा अहवाल सार्वजनिक रस्ते विभागाकडे कडे दिला आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरील काजळी नदीवरील आंजणारी येथील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. परंतु तरीही अतिवृष्टीमध्ये या पुलावरील वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांच्या पोटात भीतीचा गोळा उठत आहे. संरक्षक कठडा, कमानी, पिलर धोकादायक स्थितीत आहेत. पुराच्या पाण्यामुळे हळूहळू धूप होत असल्याचे दिसून येत आहे. काजळी नदीने अतिवृष्टीमध्ये इशारा पातळी ओलांडल्यानंतर या पुलाच्या वाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पुलालगतच्या नवीन पर्यायी पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाने मार्च २३ मध्ये आंजणारी पूल जीर्ण झाल्याचा अहवाल सार्वजनिक रस्ते विभागाकडे कडे दिला आहे.

या पुलाच्या धोकादायक स्थितीबाबत महामार्ग विभागाचे अभियंता अरविंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आंजणारी पूल धोकादायक असल्याचा अहवाल मार्च २३ मध्ये सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला देण्यात आलेला आहे. काजळी नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्यात येते. मात्र, पुलाला सद्यस्थितीत कोणताही धोका नसल्याचे सांगितले. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात २०१४ मध्ये या ब्रिटीशकालीन पुलाला पर्यायी नवीन पुलाचे काम सुरू झाले होते. मात्र हे काम अजूनही अर्धवट आहे. या पुलाच्या कामासाठी आता नवीन दुसरा ठेकेदार नेमला आहे.

तालुक्यात महामार्गाच्या हद्दीत आंजणारी आणि वाकेड हे दोन ब्रिटिशकालीन पूल आहेत. मात्र चौपदरीकरणाच्या कामात वाकेडला नवीन पूल तयार झाला आहे. आंजणारी पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१६ सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची दुर्घटना घडल्यानंतर महामार्गावरील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट राज्य शासनाने केले होते. यात आंजणारी पुलाची काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर या पुलाकडे दुर्लक्ष झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हा पूल जीर्ण झाल्याचा अहवाल देण्याचे काम करत आहे. मात्र त्यापुढील कार्यवाही होत नाही. नवीन पुलाचे कामही अर्धवट आहे.

RELATED ARTICLES

Most Popular