31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या...

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

मुंबईकर चाकरमान्यांना परतीचे वेध लागले असून, सर्वसामान्यांची...
HomeMaharashtraभारताची आणखी एक गगन भरारी, आदित्य एल-१ अंतराळात झेपावलं

भारताची आणखी एक गगन भरारी, आदित्य एल-१ अंतराळात झेपावलं

आदित्य- एल-१ ला सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही एक्सएल- रॉकेटने अवकाशात सोडण्यात आलं आहे.

चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आदित्य- एल१ यशस्वीरित्या लाँच केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही- सी५७ रॉकेटद्वारे आदित्य- एल१ चं लाँचिंग झालं आहे. यासोबतच भारताने एक नवा इतिहास रचला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजून ५० मि निटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-१ ला प्रक्षेपित केलं. लाँचिंगच्या १२७ दिवसांनंतर आदित्य एल-१ पॉईंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर तो सूर्याचा अभ्यास करेल आणि सूर्याबाबत महत्त्वाची माहिती पाठवण्यास सुरुवात करेल.

आदित्य- एल-१ ला सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही एक्सएल- रॉकेटने
अवकाशात सोडण्यात आलं आहे. एक्सएल प्रकारचे हे २५ वे उड्डाण आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड २ वरून हे प्रक्षेपण झालं. हे रॉकेट १४५.६२ फ ट उंच आहे. प्रक्षेपणाच्या वेळी त्याचे वजन ३२१ टन होते. चार टप्प्यात हे रॉकेट आदित्य-एल१ ला अवकाशात सोडणार आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे ६३ मिनिटांनी आदित्य- एल १ अंतराळयान रॉकेटपासून वेगळे झाले. या रॉकेटच्या सर्वात लांब उड्डाणांपैकी हे एक आहे. भारताच्या अन्य मिशनप्रमाणे हे सुद्धा एक लो कॉस्ट मिशन आहे. फक्त ४०० कोटी रुपयांमध्ये हे मिशन पूर्णत्वाला जाणार आहे. जगातील अन्य अवकाश संशोधन संस्था यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतायत. ही सगळी आपल्या वैज्ञानिकांची कमाल आहे.

‘आदित्य’चा प्रवास – चांद्रयानाप्रमाणेच आदित्य जातील. यानातील प्रणोदकाच्या यानही सुरुवातीला पृथ्वीजवळील एका कक्षेत परिभ्रमण करेल. त्यानंतर या यानाच्या परिभ्रमण कक्षा अधिकाधिक लंबवर्तुळाकार केल्या साह्याने (प्रॉपल्शन मॉड्यूल) ते एल वन पॉइंटच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल. या टप्प्यात यान पृथ्वीची गुरुत्वीय कक्षा ओलांडून पलीकडे जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular