24.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeIndiaअसनी चक्रीवादळाचा वेग हळूहळू मंदावतोय, दिलासादायक वृत्त

असनी चक्रीवादळाचा वेग हळूहळू मंदावतोय, दिलासादायक वृत्त

चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचेल. त्यानंतर ते कदाचित थोडे शांत होण्याची शक्यता आहे.

गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेले असनी चक्रीवादळ आता कमकुवत होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळ गुरुवारी हळूहळू बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचेल. त्यानंतर ते कदाचित थोडे शांत होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात पोहोचत असताना, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हलक्या आणि मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग ताशी ८० किमी असणार आहे. या राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या इतर राज्यांवरही वादळाचा परिणाम होणार आहे. बंगाल आणि ओडिशा लगतच्या झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी असनी चक्रीवादळ मछलीपट्टणमपासून सुमारे २० किमी उत्तर-पूर्व, नरसापूरपासून ५० किमी नैऋत्य आणि आंध्र प्रदेशातील काकीनाडापासून १२० किमी पश्चिम-नैऋत्येस होते. पावसाबाबत राज्यात अजूनही अलर्ट देण्यात आला आहे.

असनीमुळे NDRF च्या एकूण ५० टीम पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशसाठी मध्ये पाठवण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यांमध्ये NDRF ला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय विशाखापट्टणममधील आयएनएस देगा आणि चेन्नईजवळील आयएनएस रझाली या नौदल क्षेत्रात हवाई सर्वेक्षण आणि गरज भासल्यास बाधित भागात मदत कार्यासाठी अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात देखील वादळी वारे आणि विजांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस, तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार सरी पडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. येत्या काही तासांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून वातावरण पूर्ण बदलले असून मळबट पसरले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular