30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...

माजी मंत्री बच्चू कडूंचा निवडणूक आयोगासह ईव्हीएमवर हल्लाबोल

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू...
HomeEntertainmentनिलेश साबळेनी मागितली केंद्रीय मंत्र्यांची माफी

निलेश साबळेनी मागितली केंद्रीय मंत्र्यांची माफी

चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरील एक चर्चेंत असणारा कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेला कार्यक्रम आहे. त्यामध्ये दाखविण्यात आलेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात नारायण राणे यांच्यांशी संबंधित जे पात्र दाखविण्यात आले होते, ते राणेंची बदनामी करण्यासारखे असे होते. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचा आरोप राणे समर्थकांकडून करण्यात आला होता.

झी मराठीवरील हा शो प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राणे समर्थकांनी झी मराठी आणि निलेश साबळे  यांना फोन करून त्या पात्राबद्ल आपला संताप आणि नाराजगी सुद्धा व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे निलेश साबळे यांनी आपल्या टीमसह नारायण राणे यांच्या अधिश या निवासस्थानी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व हात जोडून, पाया पडून नमस्कार करत दिलगिरी व्यक्त केली.

यावेळी तेथे भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेही उपस्थित होते. काही राणे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.  नारायण राणे हे ‘चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे स्वतः प्रेक्षक असून त्यांनी वेळोवेळी कलाकारांच्या कलागुणांना वाव दिला आहे त्यांचा वेळोवेळी सन्मानच केला आहे.

निलेश साबळे त्यावेळी म्हणाले कि, कोणाच्याही भावना दुखावाण्याचा आमचा उद्देश नव्हता. पण आमच्या टीमकडून परत अशी कोणतीही चूक होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ असे म्हटल्याची माहिती राणे समर्थकांनी दिली आहे. आणि कार्यक्रमाचे निवेदक आणि दिग्दर्शक निलेश साबळे व त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पाया पडून माफी मागितली आणि या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular