24.6 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraबच्चू कडूंचा रवी राणांच्या आरोपावर जोरदार पलटवार

बच्चू कडूंचा रवी राणांच्या आरोपावर जोरदार पलटवार

'सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही.

ठाकरे गटाकडून शिवसेना सोडलेल्या या ५० आमदारांवर खोके घेतल्याचे जोरदार आरोप केले जात आहेत, असं बच्चू कडू म्हणाले. ५० आमदारांना खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच स्पष्ट करावे, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं आहे. ‘महाराष्ट्राच्या विकासाची खुंटलेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील ५० आमदारांनी स्वतः हून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्री असूनही त्याचा त्याग केला आणि शिंदेना समर्थन दिले. यावरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद काही संपायचं नाव घेत नाहीये.

रवी राणा यांनी देखील बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचा आरोप केला होता. या आरोपांवर बच्चू कडूंनी पलटवार करून त्यांना चांगलेच सुनावले आहे. विरोधक म्हणून आणि सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे त्यांचे आरोप आम्ही समजू शकतो, त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही. मात्र आता कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली.

‘सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी रवी राणा यांच्या विरोधात पोलिसामध्ये तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला आहे. आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागावी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा जोरदार पलटवार बच्चू कडून यांनी केला आहे. त्यामुळे यावर आता रवी राणा काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular