29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeIndiaकेरळमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक, चिंतेचे सावट

केरळमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक, चिंतेचे सावट

देशामध्ये कोरोनाच्या संकटानंतर अनेक नैसर्गिक संकटे सुद्धा येऊन गेली. अजून संकटांची मालिका संपतच नाही आहे. वादळ, अतिवृष्टी, भूकंप असे एक ना अनेक संकटे सुरूच आहेत. आत्ता केरळमध्ये बर्ड फ्ल्यू आजाराचा उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी कोंबड्या आणि बदकांना मारणे सुरू झाले आहे.

केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील थाकाझी पंचायत मधून बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पुरक्कडमधून पाठवण्यात आलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली आहे. याबाबत माहिती मिळताच अधिकाऱ्यानी, प्रभावित भागामध्ये एक किलोमीटर पर्यतच्या परिसरातील बदके, कोंबड्या आणि घरेलू पक्षांना मारण्याचे आदेश जारी केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी बर्ड फ्लूच्या प्रकोपाची सूचना मिळताच पशूपालन, आरोग्य आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना, अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा यांवर सविस्तर चर्चा केली.  त्यानुसार प्रशासनाने जास्त प्रभावित असलेला भाग म्हणजेच थाकाझी ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक १० जवळील एक किमी पर्यंत भागातील सर्व बदके, कोंबड्या आणि घरेलू पक्षांना मारण्याचे आदेश दिले.

संक्रमण पसरू नये म्हणून प्रशासनाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी फ्लू संभावित भागातील सर्व घरेलू पक्षी, कोंबड्या, बदक आणि पक्षांचे अंडे, मांस आदीच्या विक्रीवर बंधने घालण्यात आल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे प्रशासनाने चंपाकुलम, नेदुमुडी, मुत्तर, पुरक्कड़, अंबालापुझा दक्षिण, अंबालापुझा उत्तर, वियापुरम, करुवट्टा, थ्रीकुन्नपुझा, थकाझी, हरिप्पड नगरपालिका भागात प्रतिबंध लावण्यात आले आहेत. यासोबतच प्रशासनाने या भागातील पक्ष्यांना पकडणे आणि त्यांना नष्ट करण्यासाठी पशूपालन विभागाचे एक विशेष पथक तयार केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular