26.7 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriबावनदी, सोनवी, कोळंबे, शास्त्री पूल रखडले...

बावनदी, सोनवी, कोळंबे, शास्त्री पूल रखडले…

कच्च्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील अपघात प्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम गेले अनेक वर्ष रखडलेले आहे. आरवली ते बावनदी या अपघात प्रवण क्षेत्रात संगमेश्वर ओझरखोल ते तुरळ या पट्ट्यातील चौपदरीकरण कुर्म गतीने सुरू आहे. त्यामुळे अपघातात वाढ झाली असून वाहनचालकांचा नाहक बळी जात आहे. कच्च्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. महामार्गाचे काम सुरू होण्यापुर्वी भूमिपूजन झालेल्या बावनदी, सोनवी, कोळंबे, शास्त्री पुलांचेही काम अजून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर शास्त्री पूल, सोनवी पुलाजवळ धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच बनवण्यात आलेले जोड रस्ते ही धोकादायक बनलेल्या आहेत अनेक वेळा याच ठिकाणी अपघात घडत आहेत.

अपघात प्रवाह क्षेत्रामध्ये धोकादायक वळणे अजूनही हटवण्यात न आल्याने त्या ठिकाणी पूर्वीसारखी अपघात घडत आहेत. संगमेश्वर पैसाफंड हायस्कूलच्या समोर अनेक वेळा खड्डे पडूनही वारंवार सांगूनही ठेकेदार अजूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. पावसाळी ब्रेकनंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र काम सुरू असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संगमेश्वर दरम्यान रखडलेले आहे. या कामाचा मोठा फटका प्रवाशांना आणि वाहनचालकांना बसत आहे. संगमेश्वर तालुक्यातील बावनदी सोनवी कोळंबे या पूलांची कामे संथ गतीने सुरू आहेत त्याचा फटका वाहतूक कोंडीला बसत असून अर्धा तासाच्या प्रवासाला दोन ते तीन तास प्रवास वेळ लागत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत.

धुळीचा वाहनचालकांना त्रास – मोठ्या वाहनांमुळे सिमेंट अथवा खड्यात टाकलेल्या खडीची धूळ मोठ्या प्रमाणात परिसरात पसरत असून धुळीमुळे संसर्गजन्य रोगांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला बदलते वातावरण आणि त्यामुळे बसणारा फटका त्या दुसऱ्या बाजूला धुळीचे लोट यामुळे संगमेश्वरवाशियाना त्रास सहन करावा लागत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular