29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeRatnagiriहेच का मोदी सरकारचे अच्छे दिन ! - सौ. कांचन नागवेकर

हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन ! – सौ. कांचन नागवेकर

कुटुंबाचा भार कसा चालवायचा हा मोठा प्रश्‍न महिला वर्गासमोर उभा राहिला आहे.

राज्यामध्ये सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता जेरीस आली आहे. कोरोनामुळे एक तर उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने, या महागाईपुढे कसा तग धरणार अशी चिंता सामान्य परिस्थितीत जगणाऱ्या माणसांना सतावत आहेत. या सर्व महागाईच्या जमान्यात सर्वात जास्त तडजोड महिला वर्गाला करावी लागत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महिला तालुका संघटक सौ कांचन नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

वारंवार होत असलेली इंधन वाढीमुळे सर्वांनाच त्याची झळ बसत आहे. घरगुती वस्तू, भाजीपाला, कडधान्य, दुध, कपडे या सगळ्यामध्येच भरमसाठ दरवाढ झालेली आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतुकीसाठी सुद्धा वाढीव दर आकारले जात असल्याने, भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. यातून महिलांना कुटुंबाचा भार चालवणे कठीण बनले असून, त्यांच्यासाठी ती तारेवरची कसरत होत आहे. या सर्व गोष्टींसाठी मोदी सरकार जबाबदार असून त्याची जाणीव करुन देण्यासाठी दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर दुपारी तीन वाजता शहरातील मोदींच्या फोटोंची आरती करून आंदोलन छेडणार आहेत.

त्या म्हणाल्या दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढल्याने, त्या संबंधित असणाऱ्या सर्वच गोष्टींवर त्याचा परिणाम होताना दिसत असल्याने भाजीपाला, कडधान्य व इतर गृहोपयोगी वस्तूंचेही दर कडाडले आहेत. कुटुंबाचा भार कसा चालवायचा हा मोठा प्रश्‍न महिला वर्गासमोर उभा राहिला आहे.

मोदी सरकारचे अच्छे दिन ते हेच का या सर्व गोष्टींची मोदी सरकारला जाणीव करून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडणार आहेत. शहरातील ठिकठिकाणी असलेल्या मोदींच्या फोटोची आरती करून हे आंदोलन होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular