देशात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये वापरल्या जाणार्या दोन महत्वाच्या लसीपैकी एका लसीची निर्मिती हैद्राबाद येथील भारत बायोटेक कंपनीने केली आहे. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत पुण्याबाहेरील मांजरी येथील भारत बायोटेक प्लांटला भेट दिली. भेट दिलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भारत बायोटेकची सहयोगी संस्था बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड लस उत्पादनासाठी पूर्णपणे कार्यरत प्लांट बनविण्याचे काम पुर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
अधिकारी आता ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. पूर्वी पशुवैद्यकीय लसी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला प्लांट २०१३ साली बंद करण्यात आला होता. या प्लांटचा वापर आता कोविड-१९ लसींच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी केला जाईल.
देशमुख पुढे म्हणाले, बुधवारी मी, एफडीए अधिकारी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांसह भारत बायोटेक प्लांटला भेट दिली. तसेच, माझी हैदराबाद येथे डायरेक्टर यांच्याशी भेट झाली. मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तसेच प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री प्रमाणित केली आहे. त्याचबरोबर त्यांनी DCGI कडे अंतिम परवान्यासाठी अर्ज केला आहे. मी DCGI अधिकार्यांना फोन केला आणि त्यांना लवकरात लवकर परवानगी देण्याची विनंती केली. मी, एफडीए आणि प्लांट अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार लवकरात लवकर तपशील देण्यास सांगितले आहे.”
एफडीएचे सहआयुक्त एस.बी. पाटील हे देखील उपस्थित होते, यावेळी ते म्हणाले, “या प्लांटचा वापर मोठ्या प्रमाणात तयार उत्पादनासाठी केला जाईल आणि आम्ही अपेक्षा करतो की प्लांटमध्ये ३००० किलो-लिटर लस तयार केली जाईल. ते DCGI कडून परवान्याची वाट पाहत आहेत. संयुक्त तपासणी अहवाल डीसीजीआयकडे पाठवण्यात आला. याचा वापर नाकातील कोविड-१९ लस तयार करण्यासाठी केला जाईल.