26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeIndiaभाजप खासदाराची दिल्ली जल बोर्डाच्या अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक

भाजप खासदाराची दिल्ली जल बोर्डाच्या अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक

संजय शर्मा यांनी भाजप खासदाराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

दिल्ली जल बोर्डाच्या ज्या अधिकाऱ्यासोबत भाजप खासदार परवेश वर्मा यांनी गैरवर्तणूक केली, त्याच अधिकाऱ्याने आज त्याची जलपरीक्षा दिली आहे. जल बोर्डाचे संचालक संजय शर्मा यांनी रविवारी यमुनेच्या पाण्यात स्नान केले. यमुनेचे पाणी स्वच्छ आहे, विषारी नाही, असेही सांगितले. दोन दिवसांपूर्वी भाजप खासदार संजय शर्मा यांना फटकारले होते आणि यमुनेच्या पाण्यात स्नान करण्याचे आव्हान दिले होते.

संजय शर्मा यांनी यमुनेचे पाणी बादलीत भरले आणि आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. आंघोळ केल्यावर शर्मा म्हणाले पाण्याची बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड पातळी १२-१३ आहे, तर टीएसएस टॉक्सिक शॉक सिंड्रोम २० च्या खाली आहे, फॉस्फेट ०.१ आहे आणि विरघळलेला ऑक्सिजन ७.० पेक्षा जास्त आहे. यमुना नदीचे पाणी स्वच्छ आहे. लोक मोकळेपणाने त्यात डुंबू शकतात.

याप्रकरणी संजय शर्मा यांनी भाजप खासदाराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २८ ऑक्टोबर रोजी ते ओखला बॅरेज कालिंदी कुंज येथे ड्युटीवर होते आणि यमुनेमध्ये फेस प्रतिबंधक रसायनाची फवारणी करत होते. त्याचवेळी परवेश वर्मा आणि तजिंदर बग्गा तेथे आले आणि त्यांना धमकावून गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संजय शर्मा दिल्ली जल बोर्डमध्ये उपचार गुणवत्ता नियंत्रण संचालक म्हणून कार्यरत आहेत.

दोन दिवसांपूर्वी छठपूजेसाठी यमुना नदीच्या दुरवस्थेची माहिती घेण्यासाठी आलेल्या खासदार वर्मा यांनी डीजेबी अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले. त्यांनी अधिकाऱ्याला फटकारले आणि सांगितले की आठ वर्षात तुम्हाला हे आठवले नाही?  इथे तुम्ही लोकांना मारताय, गेल्या आठ वर्षांत तुम्हाला यमुना स्वच्छ करता आली नाही. अधिकारी म्हणाले की यामुळे लोक मरत आहेत असे कसे म्हणता. खासदार म्हणाले- तुम्हाला  यामध्ये बुडवून दाखवतो. अधिकारी म्हणाले तुम्हाला एवढा राग का येतोय, हे लिक्विड पाणी स्वच्छ  करण्यासाठी घालण्यात आले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular