26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriया भूमीचा, महाराष्ट्राचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही - भाजप प्रदेशाध्यक्ष...

या भूमीचा, महाराष्ट्राचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

राहुल गांधी यांनी ही कोठडी बघावी, साखळदंड, बेड्या बघाव्या. सावरकर यांनी लिहिलेली पुस्तके बघावी. आज मी हे सारे बघितले, भावना अनावर झाल्या.

भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी दौऱ्यात असताना स्वातंत्रवीर सावरकर यांना स्थानबद्ध करण्यात आलेल्या रत्नागिरी येथील विशेष कारागृहातील स्मारक, कोठडी व सावरकरांनी अस्पृश्य तसेच प्रत्येक बांधवांना देवाची पूजा आणि मूर्तीला स्पर्श करण्यासाठी बांधलेल्या पतित पावन मंदिराला विशेष करून भेट दिली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी यांचा सुरु असलेले भारत जोडो अभियान सर्वजण पाहतच आहेत. अनेक नेते, कलाकार, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते त्यांच्या अभियानात त्यांना जाऊन साथ देत आहेत. परंतु त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर मात्र अनेकांनी निषेध नोंदवला आहे. बावनकुळे यांनी देखील, स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर बोलण्याची लायकी आहे का, असाही त्यांनी टोला लगावला.

आज बाळासाहेब ठाकरे असतेत तर राहुल गांधी यांना राज्यातून हाकलून लावले असते, परंतु त्यांचे नातू मात्र त्यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी ही कोठडी बघावी, साखळदंड, बेड्या बघाव्या. सावरकर यांनी लिहिलेली पुस्तके बघावी. आज मी हे सारे बघितले, भावना अनावर झाल्या. या भूमीचा, महाराष्ट्राचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी राहुल गांधी यांना दिला. पुढे ते म्हणाले, स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांना वारंवार लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बुद्धिभ्रंश झाला असून त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीवरून डॉक्टर पाठवायला पाहिजे, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.

या वेळी त्यांच्यासोबत भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, पतितपावन मंदिर संस्थेचे अॅड. बाबा परुळेकर, शहराध्यक्ष सचिन करमकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular