25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriया पळपुट्या सरकारमुळे राज्यात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण - ॲड. दीपक पटवर्धन

या पळपुट्या सरकारमुळे राज्यात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण – ॲड. दीपक पटवर्धन

भ्रष्ट आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून, घोटाळे उघडकीस आणणाऱ्यांवरच कारवाई करण्याच्या धोरणामुळेच ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून केवळ दडपशाही करून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे

कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्याऐवजी ठाकरे सरकार जनतेला घरात बसण्यास भाग पाडले. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची ऐशीतैशी झाली. शैक्षणिक संस्थाना कुलपे लावल्याने विद्यार्थ्यांना घरात बंद करण्यात आले,  त्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीने ग्रामीण भागात सुविधाच उपलब्ध नसल्याने, मुलांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

आणि आता कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यासाठी ठाकरे सरकार पुढे सरसावले आहे, हे सोमैय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून स्पष्ट दिसत असल्याचे वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. किरीट सोमैया यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल या भीतीपोटी सोमैया यांनाच काही तास डांबून ठेवण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार असल्याचे ते पुढे म्हणाले आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला अशा भ्याडपणामुळे जास्तीच पाठबळ मिळत आहे, असा थेट आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये केला आहे.

अशा या पळपुट्या सरकारमुळे राज्यात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाली असून, आलेलं अपयश झाकण्याकरिता ठाकरे सरकार स्वतःच्याच सुरु असलेल्या कारभारावर एक प्रकारे प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे. कोणतेही उचित धोरण आणि निर्णय घेण्याची क्षमता नसल्यामुळे कोणत्याही प्रश्नावर ठाम भूमिका न घेता, प्रश्नच मुळात दडपण्याच्या धोरणामुळे, राज्य सरकारने जनतेला असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर नेऊन सोडले असून, गुन्हेगार मात्र मोकाट फिरताना दिसत असल्याचा आरोपही श्री. पटवर्धन यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular