25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriरत्नागिरी मतदासंघात भाजपची भूमिका निर्णायक, मंत्री सामंत यांच्यासोबत सामना

रत्नागिरी मतदासंघात भाजपची भूमिका निर्णायक, मंत्री सामंत यांच्यासोबत सामना

रत्नागिरीतून भाजपनेही उमेदवारीची मागणी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व मंत्री उदय सामंत यांचा सामना करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीला सुरुवात झाली आहे; परंतु रत्नागिरीतून भाजपनेही उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे यामध्ये माजी आमदार बाळ माने यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे सन २००४ मध्ये युतीचा धर्म पाळत असलेले उदय बने सक्रियपणे प्रचारयंत्रणा राबवत होते; परंतु छुप्या पाठिंब्याचा फटका बसल्यामुळे त्यांना युतीचा उमेदवार निवडून आणता आला नाही.

महाविकास आघाडीमध्ये ठरल्याप्रमाणे निवडणुकी अगोदरच उमेदवार ठरवून काम करण्याचे आदेश देण्यात आल्याचे बोलले जात आहे. निरीक्षक म्हणून आलेले आमदार मिलिंद नार्वेकर यांनी कोणाला हिरवा कंदील दिला आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे; मात्र जो कोणी उमेदवार असेल त्याला मंत्री सामंत यांच्याशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात झाली आहे. अस्तित्वाची लढाई असल्याने प्रत्येकाने मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला चांगल्या त-हेने पाठिंबा दिल्यामुळे मतदारसंघातील शिवसेनेचा उत्साह वाढलेला आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी व महायुती यांचे वरिष्ठ पातळीवर जागा वाटप निश्चित होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येण्यासाठी आघाडी व युती यांचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर उमेदवारांना काम करण्याचे आदेश आहेत. महायुतीतर्फे विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघात पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु येथे भाजपही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

त्यादृष्टीने भाजप मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय युतीच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपला तिकीट न मिळाल्यास ठाकरे शिवसेना भाजपला छुपा पाठिंबा देणार की, वरिष्ठांचा आदेश पाळून युतीचा धर्म पाहणार, हे येणारा काळ ठरवणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular