26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraअवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, आरोग्यमंत्री टोपे

अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, आरोग्यमंत्री टोपे

जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष अभ्यास करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष अभ्यास करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान बाबतच्या राज्य कार्य गटाची मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी श्री टोपे. यांनी संबंधिताना सूचना दिल्या आहेत. सहाय्यक संचालक डॉ.अरुण यादव यांनी प्रथम राज्य कार्य गटाच्या बैठकीबाबत जो अवयवदानाचा मुख्य उद्देश आहे तो सांगितला.

मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, संचालक डॉ साधना तायडे उपस्थित होते.

राज्यातील अवयवदान हि संकल्पना वाढण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मत बैठकीत सर्वानुमते व्यक्त करण्यात आले. अवयवदान चळवळीस व्यापक स्वरूप देण्यासाठी याबाबत लोकांना माहिती,  शिक्षण, संवाद या माध्यमातून जाणीव जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

त्याचप्रमाणे अवयवदानाबाबत मुंबईतील सायन आणि केईएम रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांचा अभ्यासक्रम सुरु करावा. वैद्यकीय शिक्षण विभागाने तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून हा अभ्यास करावा, असा निर्णय घेण्यात आला. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर उपलब्ध आहेत. याचबरोबर कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि सोलापूर येथे अशा प्रकारे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी अशा प्रकारच्या अवयवदानामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण ज्ञान मिळायला मदत होते.

RELATED ARTICLES

Most Popular