29.4 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriमहामार्ग अपघातांवर नियंत्रण आणा - मंत्री उदय सामंत

महामार्ग अपघातांवर नियंत्रण आणा – मंत्री उदय सामंत

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे गेल्या दोन महिन्यांत मोठे आणि गंभीर अपघात झाले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गॅसटँकर, ओव्हरलोड कोळसा, दगडसह अन्य होणारी वाहतूक यामुळे वारंवार गंभीर अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिंदल कंपनीच्या अधिकाऱ्यांसह, आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग विभाग, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सामंत यांनी अधिकाऱ्यांची शेलक्या शब्दात कानपिचक्या दिल्या. जेएसडब्ल्यूच्या ओव्हरलोड वाहतुकीवर कोणाचे नियंत्रण नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. यावर तत्काळ नियंत्रण आणा, असे सुनावले. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे गेल्या दोन महिन्यांत मोठे आणि गंभीर अपघात झाले. हातखंबा उतारात वळणावर रस्त्याला असणाऱ्या तीव्र उतारामुळे अपघातांची ही संख्या वाढली आहे. या ठिकाणी चौपदरीकरणाच्या रस्त्याचे कामही संथगतीने सुरू आहे. हातखंबा हायस्कूलजवळ नवीन करण्यात आलेला काँक्रिट रस्ता संपतो, जुना रस्ता व काँक्रिटचा रस्ता यामध्ये तीन ते चार फुटांचे अंतर असून, त्या ठिकाणी रस्त्याचा उतार तीव्र आहे.

तेथून पुढे गेल्यावर तीव्र वळण असून खड्डे आहेत. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने आठ गाड्यांना चिरडले होते. यात एका युवकाचा बळी गेला तर गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाली येथील निवासस्थानी आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह जेएसडब्ल्यूच्यी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात जेएसडब्ल्यूसह महामार्ग अधिकारी आणि ठेकेदारांची सामंत यांनी चांगलीच हजेरी घेतली. कंपनीमधून क्षमतेपेक्षा अधिक माल भरलेले ट्रक आत-बाहेर कसे करतात, यावर कोणाचे नियंत्रण नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला. भरलेले व रिकामे ट्रक भरधाव चालवले जात असून, अनेक अपघात होत आहेत, असे सामंत यांनी जेएसडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले.

RELATED ARTICLES

Most Popular