24.6 C
Ratnagiri
Friday, November 28, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriचिपळूण बसस्थानकाचे काम सहा वर्षांनी सुरू...

चिपळूण बसस्थानकाचे काम सहा वर्षांनी सुरू…

एसटी महामंडळाने पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द केला.

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चिपळूणच्या ‘हायटेक’ बसस्थानकाचे काम सुरू झाले आहे; मात्र राज्य सरकारकडून बसस्थानकाच्या कामासाठी पुरेसा निधी मिळालेला नाही. तो वेळेत मिळाला नाही तर पुन्हा काम बंद पडण्याची भीती आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाची इमारत जीर्ण झाली होती. ती तोडून त्या जागी नव्याने सर्व सोयी-सुविधांनीयुक्त ‘हायटेक’ बसस्थानक उभारण्यास सहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली; मात्र ठेकेदाराने वेळेत काम सुरू केले नाही. अनेक अडचणींमुळे बसस्थानकाच्या बांधकामाचा बट्ट्याबोळ उडाला. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकाचे नूतनीकरण केले जात असताना चिपळूणच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे काम रखडले.

शिवाजीनगरच्या बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला. त्यामुळे पावसाळ्यात चिपळूण आगाराचे काम शिवाजीनगर बसस्थानकावरून सुरू झाले. गणेशोत्सवासाठी चिपळुणात एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय दूर झाली; मात्र विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पुन्हा सुरू व्हावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला; मात्र ठेकेदाराने कामाला सुरुवात केली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द केला. त्यानंतर दुसरा ठेकेदार नेमण्यात आला. त्यानेही काम सुरू केले नाही. त्यामुळे त्यालाही बदलण्यात आले. दोन ठेकेदार बसस्थानकाच्या इमारतीचा केवळ पाया रचण्यात आला होता. सिमेंट काँक्रिटचे खांब उभे करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular