27.3 C
Ratnagiri
Thursday, December 18, 2025

रत्नागिरी रेल्वेस्थानकात तिकीट विक्रीत काळा बाजार

रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे तत्काळ तिकीटविक्री ठिकाणी काळ्या...

‘नो रोड, नो वोट !’ संगमेश्वरातील संभाजीनगरचा संतापाचा उद्रेक

संगमेश्वर तालुक्यातील संभाजीनगर येथील ग्रामस्थांचा संयम अखेर...

खैराची झाडे तोडण्यास आता परवानगी नको!

कोकणातील शेतकऱ्यांच्या आणि स्थानिक रहिवाशांच्या दृष्टीने राज्य...
HomeRatnagiriजिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड

निवडणुकीचाच कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

राज्यातील महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे; मात्र जिल्हा परिषद निवडणुकीची सर्व तयारी करूनही या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे मिनी मंत्रालयात जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्यांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक विभाग व निर्वाचन गणांची अंतिम आरक्षण अधिसूचना ३ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण ५६ गट असून, त्यातील २८ गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जातीसाठी दोन गट असून, एक गट महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी एक गट आरक्षित असून, तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे. इतर मागासर्गीय गटासाठी (ओबीसी) १५ गट असून, त्यातील ८ गट महिलांसाठी तर सर्वसाधारण ३८ गट असून, त्यातील १८ गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या नऊ पंचायत समित्या असून, त्यासाठी ११२ गण आहेत. या सर्व गट व गणांचे अंतिम आरक्षण अधिसूचना जारी झाली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे फटाके फुटणार असल्याचे गृहित धरून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. गेली साडेतीन महिने पायाला भिंगरी लावून प्रचार केला. मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. उमेदवारांचा मतदाराबरोबर संपर्क सुरूच आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती; पण सोमवारी महापालिकांच्या निवडणुकीचाच कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. यामुळे इच्छुकांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular