29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunनदीतील गाळ आणि बेटे काढल्याशिवाय, जुने पूल न तोडण्याची मागणी

नदीतील गाळ आणि बेटे काढल्याशिवाय, जुने पूल न तोडण्याची मागणी

शहरातील खेर्डी, मुरादपूर रामोशिवाडी, नलावडे बंधारा, एमआयडीसी येथील गुरुकुल कॉलेज या चारही ठिकाणांवर नदीचे पाणी वाढून वेगाने शहरामध्ये घुसते.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये मागील जुलै महिन्यामध्ये उद्भवलेल्या महापुराच्या संकटामुळे, मोठ्या प्रमाणात नदीचा गळ उपसा करण्यासाठी आंदोलने केली गेली. बरीच वर्षे गाळ उपसा न केल्यानेच पावसाच्या पाण्याचा कुठे निचरा झाला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तिथे महापुराची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे हा गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशनच्या मदतीने, अनेक तयार झालेलेई बेटे देखील काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

चिपळूण शहरातील बहादूरशेख भागातील वाशिष्ठी नदीवरील जुने दोन्ही ब्रिटिशकालीन पूल यांच्या दरम्यान नदीपात्रात बेटे तयार झालेली आहेत. तेथील जागेवर नदीपात्रातील दगड, गोटे, मकींग व अन्य गाळ वगैरे मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. या दोन्ही ब्रिटिशकालीन पुलांची वयोमर्यादा संपुष्टात आली असून नवीन स्वतंत्र पुलाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे.

शहरातील खेर्डी, मुरादपूर रामोशिवाडी, नलावडे बंधारा, एमआयडीसी येथील गुरुकुल कॉलेज या चारही ठिकाणांवर नदीचे पाणी वाढून वेगाने शहरामध्ये घुसते. जर वेळीच या बेटाचा बंदोबस्त केला नाही तर पुन्हा महापुराची परिस्थिती उध्दभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या चार ठिकाणी संरक्षक भिंत किंवा बंधारा बांधण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

सध्या दोन्ही पुलांच्या दरम्यान नदीपात्रात प्रचंड प्रमाणात साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तो नदीपात्रातून काढून अन्य ठिकाणी याच जुन्या पुलावरून नेला जात आहे. या कामाला आणखी काही महिने लागण्याची शक्यता असल्याने जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दोन्ही जुने पूल तोडू नये, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular